आजच्या फायनलनंतर इमोशनल पोस्ट करत केली खेळाडूने घोषणा…

आयपीएलच्या १६ व्या सीझनचा विजेता कोण? हे काही तासातच आपल्याला समजणार आहे. ipl २०२३ च्या १६व्या सिजझनमध्ये अटीतटीचा सामना बघायला मिळाला. सेमीफायनल मध्ये गुजरात टायटन्स च्या विरोधात मुंबई इंडियन्स अशी चुरस बघायला मिळाली. परंतु काही थोड्याशा फरकाने मुंबई इंडियन्स ना पराभव पत्करावा लागला.

आजच्या फायनलनंतर इमोशनल पोस्ट करत केली खेळाडूने घोषणा…

आयपीएलच्या १६ व्या सीझनचा विजेता कोण? हे काही तासातच आपल्याला समजणार आहे. ipl २०२३ च्या १६व्या सिजझनमध्ये अटीतटीचा सामना बघायला मिळाला. सेमीफायनल मध्ये गुजरात टायटन्स च्या विरोधात मुंबई इंडियन्स अशी चुरस बघायला मिळाली. परंतु काही थोड्याशा फरकाने मुंबई इंडियन्स ना पराभव पत्करावा लागला. तर गुजरात टायटन्स ने बाजी मारत आपले स्थान फायनल मध्ये रोवले. त्यामुळे आजच्या या चुरशीच्या लढ्यात धोनीची चेन्नई सुपर किंग्स आणि हार्दिक पांड्याची गुजरात टायटन्स या दोन्ही टीम आमने सामने उभे ठाकणार आहेत. तर या सामन्यात धोनीची चेन्नई सुपर किंग्स आणि हार्दिक पांड्याची गुजरात टायटन्स कोण विजयी संघ हे यावर्षीच्या ipl २०२३ च्या ट्रॉफीवर नाव करणार या प्रश्नाचं उत्तर काही तासांत मिळणार आहे. पण त्यापूर्वीच एक मोठी बातमी समोर आली आहे.

चेन्नईचा विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याची गणती केली जाते त्या अंबाती रायडू याने त्याच्या निवृत्तीची घोषणा केली आहे. अंबाती रायडू याने ट्वीट करत आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. अंबाती रायडू याला मुंबई आणि चेन्नई या दोन संघाचा भाग होण्याची संधी मिळाली. १४ हंगाम ,२०४ सामने, ११ प्लेऑफ, ८ फायनल आणि ५आयपीएल चषके असे रेकॉर्ड त्याच्या नावावर आहेत. आणि आजचा हा चषक जिंकू अशी त्याला आशा देखील आहे. आज रात्री होणारी सामना माझ्या आयपीएल करिअरचा अखेरचा सामना असेल. अशी इमोशनल पोस्ट आंबटी रायडूने केली आहे.

अंबाती रायडूच्या आयपीएल करिअर बद्दल आढावा घेतला तर मागील १४ वर्षांपासून अंबाती रायडू आययीपएलमध्ये धावांचा पाऊस पाडतोय. 2010 पासू रायडूच्या आयपीएल करिअरला सुरुवात झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत त्याने २०३ सामने खेळले आहेत. यामध्ये तो ३३ वेळा नाबाद राहिलाय. अंबाती रायडू याने १२८ च्या स्ट्राईक रेटने आणि २९ च्या सरासरीने ४३२९ धावा केल्या आहेत. रायडूने आतापर्यंत एक शतक आणि २२ अर्धशतके झळकावली आहेत. तर १७१ षटकार आणि ३५८ चौकार ठोकले आहेत. त्याशिवाय ६४ झेल आणि २ स्टपिंगही त्याच्या नावावर आहेत. रायडूने याच्यासाठी २०१८ चा हंगमात सर्वोत्कृष्ट होता. या हंगामात रायडूने १६ सामन्यात ६०२ धावांचा पाऊस पाडला होता.

हे ही वाचा:

IPL 2023, चेन्नईचा संघ अंतिम सामन्यात तर गुजरात खेळणार क्वालिफायर २ चा सामना

Anushka Sharma च्या चित्रपटाचे डायलॉग Virat Kohli ला तोंडपाठ…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version