Tuesday, May 21, 2024

Latest Posts

IPL 2023, चेन्नईचा संघ अंतिम सामन्यात तर गुजरात खेळणार क्वालिफायर २ चा सामना

इंडियन प्रीमियर लीगचा (Indian Premier League) काल क्वालिफायर १ (Qualifier 1) चा सामना पार पडला. चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) कालच्या सामन्यांमध्ये दमदार कामगिरी करून गुजरात टायटन्सला पराभव केले.

इंडियन प्रीमियर लीगचा (Indian Premier League) काल क्वालिफायर १ (Qualifier 1) चा सामना पार पडला. चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) कालच्या सामन्यांमध्ये दमदार कामगिरी करून गुजरात टायटन्सला पराभव केले. गुजरातला पराभूत करून चेन्नई सुपर किंग्सने १५ धावांनी विजय मिळवला. चेन्नई सुपर किंग्स चा संघ आयपीएल २०२३ मध्ये अंतिम सामना खेळणारा पहिला संघ ठरला आहे. गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करून चेन्नईच्या फलंदाजांनी सामन्यामध्ये दमदार सुरुवात केली होती. चेन्नईचे सलामी फलंदाज ऋतुराज गायकवाड Rituraj Gaikwad) आणि डेव्हिड कॉनवे (David Conway) या दोन्ही फलंदाजांनी धुव्वादार फलंदाजी करून १७३ धावांचे लक्ष गुजरात टायटन्सकडे उभे केले होते.

गुजरात टायटन्सच्या खराब कामगिरीमुळे गुजरातचे फलंदाज चेन्नईच्या गोलंदाजसमोर फार वेळ काही टिकू शकले नाही. गुजरातचा सलामी फलंदाज रिद्धिमान साहा (Wriddhiman Saha) १२ धावा करून दीपक चाहरने Deepak Chahar) त्याचा खेळ संपवला. तर मागील दोन सामन्यांमध्ये शतक झळकावणारा शुभमन गिलने (Shubman Gill) सर्वाधिक ४२ धावा करून करून दीपक चाहरने त्याची विकेट घेतली. गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याची बॅट सुद्धा कालच्या सामन्यामध्ये फक्त ७ चेंडूंमध्ये ८ धावा करू शकली. कालच्या सामन्यामध्ये दीपक चाहर, महेश तीक्षणा, रवींद्र जडेजा आणि माथेशा पाथीराणा हा गोलंदाजांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तर चेन्नईचा तुषार देशपांडेने १ विकेट घेतली.

चेन्नईच्या सलामी जोडीमधील ऋतुराज गायकवाड ने ४४ चेंडूंमध्ये ६० धावा केल्या तर कॉनवेने ३४ चेंडूंमध्ये ४० धावा केल्या. परंतु सलामी जोडी बाद झाल्यानंतर चेन्नईच्या धावांचा वेग थंडावला. शिवम दुणे याने फक्त १ धाव करून बाद झाला. तर अजिंक्य रहाणे १० चेंडूंमध्ये १७ धावा करून विकेट्स गमावली. अंबाती रायडू सुद्धा फार काही धावा करून शकला नाही तर चेन्नई सुपर किंगचा कर्णधार कॅप्टन कूल सुद्धा कालच्या सामन्यामध्ये फक्त १ धाव करून बाद झाला. परंतु चेन्नई गोलंदाजांनी उत्तम कामगिरी करून सामना जिंकवून दिला. आता चेन्नई सुपर किंग्सचा संघ अंतिम फेरीमध्ये इंडियन प्रीमियर लींगचा फायनलचा सामना खेळणार आहे तर गुजरात टायटन्सचा संघ एलिमिनेटर सामन्यामध्ये विजयी होणाऱ्या संघासोबत क्वालिफायर २ चा सामना खेळणार आहे.

हे ही वाचा:

Manipur मध्ये माजी आमदाराने भडकवली दंगल, तब्बल ५ दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद

जयंत पाटलांना #ED चौकशीत घेऊन कोणाचा कार्यक्रम कोण करतंय? Who is targeting |

ईडीकडून नोटीस मिळाल्यावर शक्तिप्रदर्शन करण्याचा नवीनच पॅटर्न – संजय शिरसाट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss