महिला कुस्तीपटूंचे प्रकरण केंद्र सरकार संवेदनशीलपणे हाताळत आहे, Anurag Thakur

कुस्तीपटूंच्या जंतरमंतर आंदोलनाचा वाद हा चिघळत चालला आहे. महिला कुस्तीपटूंच्या केलेल्या शोषणाच्या आरोपच प्रकरण हे केंद्र सरकार संवेदनशीलपणे हाताळत आहे असे केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले आहे.

महिला कुस्तीपटूंचे प्रकरण केंद्र सरकार संवेदनशीलपणे हाताळत आहे, Anurag Thakur

कुस्तीपटूंच्या जंतरमंतर आंदोलनाचा वाद हा चिघळत चालला आहे. महिला कुस्तीपटूंच्या केलेल्या शोषणाच्या आरोपच प्रकरण हे केंद्र सरकार संवेदनशीलपणे हाताळत आहे असे केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले आहे. महिला कुस्तीपटूंनी अनेक मागण्या केल्या आहेत. त्यांनी केलेल्या मागणीनुसार या प्रकरणासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. त्याबाबतीत तपास सुरु आहे. बृजभूषण सिंह यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी असे साक्षी मलिक, विनेश फोगाट, बजरंग पुनिया आणि संगीता फोगाट यांनी ही मागणी करून दिल्लीमध्ये आंदोलन करत आहेत.

केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर आजपासून मुंबई दौऱ्यावर आहेत. अनुराग ठाकूर यांना कुस्तीपटूंच्या आंदोलनावर प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, केंद्र सरकार प्रदर्शन करणाऱ्या कुस्तीपटूंच्या मुद्द्यावर संवेदनशील आहे असे. कुस्तीपटूंनी केलेल्या मागण्यांनुसार पोलिसांनी गून्हा गुन्हा दाखल केला आहे. आणि या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. कुस्तीपटूंनी असे कोणतेही पॉल उचलू नये जे खेळ किंवा खेळाडूंना नुकसान पोहोचवेल असे आवाहन अनुराग ठाकूर यांनी दिले आहे.

याआधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पात्र लिहिले होते त्यामध्ये त्यांनी कुस्तीपटू महिलांना न्याय द्यावा अशी मागणी केली होती. त्याचबरोबर राज ठाकरे यांनी पत्रामध्ये लिहिले होते की, ज्याचा गौरव आपण देश की बेटीया असा करत आलो आहे त्याच्या श्रमातून आपल्या देशाला कुस्तीच्या खेळामध्ये अनेक पदक मिळवून दिले आहे अशा कुस्तीपटू न्यायासाठी आक्रोश करत असताना २८ मे रोजी ज्या पद्धतीने त्याची जशी फरफट झाली तशी फरफट पुन्हा होऊ नये. आपण स्वतःहा या प्रकरणामध्ये लक्ष द्यावे अशी त्यांनी नम्र विनंती केली आहे.

हे ही वाचा:

खुशखबर!, LPG Gas Cylinder च्या दरात मोठी कपात, पाहा Latest Rates

Nitin Gadkari म्हणाले, ‘मंदिरांमध्ये स्वच्छतेचा अभाव आहे, मी…’

संजय शिरसाट यांना पोलिसांकडून दिलासा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version