Wednesday, April 24, 2024

Latest Posts

CSKvsDC, दिल्ली कॅपिटल्स चेन्नई सुपर किंग्सला प्लेऑफमध्ये जाण्यापासून रोखणार का?

आयपीएल २०२३ (IPL 2023) चा हा सिझन अत्यंत रोमांचक होत चालला आहे. आयपीएल मध्ये आजचा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Chennai Super Kings vs Delhi Capitals) या संघांमध्ये पार पडणार आहे.

आयपीएल २०२३ (IPL 2023) चा हा सिझन अत्यंत रोमांचक होत चालला आहे. आयपीएल मध्ये आजचा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Chennai Super Kings vs Delhi Capitals) या संघांमध्ये पार पडणार आहे. आजचा हा सामना दिल्लीमधील अरुण जेटली स्टेडियमवर (Arun Jaitley Stadium) पार पडणार आहे. आज आयपीएलमध्ये दोन सामने पार पडणार आहेत. पहिला सामना आज दुपारी ३.३० वाजता खेळवला जाणार आहे. चेन्नईच्या संघाचा आजच्या सामन्यामध्ये पराभव झाल्यास ते प्लेऑफ च्या शर्यतीतून बाहेर होण्याची शक्यता आहे. प्लेऑफमध्ये जाण्यासाठी ६ संघ अजूनही लढत आहेत.

चेन्नई सुपर किंग्सने आतापर्यत या आयपीएलच्या सीझनमध्ये १३ सामन्यांपैकी ७ सामने जिंकले आहेत तर पाच सामन्यामध्ये पराभवाचा सामना करावा लागणार आहे. तर दिल्ली कॅपिटल्सचा संघ गुणतालिकेमध्ये सर्वात तळाला आहे. दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यत १३ सामने खेळले आहेत त्यापैकी त्यांना फक्त पाच सामाने जिंकता आले आहेत आणि आठ सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे.

चेन्नई सुपर किंग्स ची संभाव्य प्लेइंग ११
ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अंबाती रायुडू, अजिंक्य रहाणे, मोईन अली, रविंद्र जडेजा, शिवम दुबे, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकिपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, महेश तीक्षणा

दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य प्लेइंग ११
डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), रिली रुसो, पृथ्वी शॉ, अमन हकीम खान, यश धुल, अक्षर पटेल, फिलीप सॉल्ट (विकेटकीपर), एनरीज नॉर्टजे, खलील अहमद, केएल यादव, इशांत शर्मा

हे ही वाचा : 

RCB vs SRH, कोहली मारणार बाजी की शेवटच्या सामन्यामध्ये सनरायजर्स हैदराबाद होणार विजयी

भारतीय स्टेट बँकेने ग्राहकांना दिले भामट्यांकडून खबरदारी बाळगण्याचे आव्हान

शुभमन गिलच्या नव्या चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss