CSKvsPBKS, एम एस धोनी आणि शिखर धवन आमनेसामने

इंडियन प्रीमियर लीग २०२३ मध्ये आज दोन सामने रंगणार आहेत. त्यामधील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स (Chennai Supar Kings) विरुद्ध पंजाब किंग्स (Punjab Kings) यांच्यामध्ये रंगणार आहे.

CSKvsPBKS, एम एस धोनी आणि शिखर धवन आमनेसामने

इंडियन प्रीमियर लीग २०२३ मध्ये आज दोन सामने रंगणार आहेत. त्यामधील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स (Chennai Supar Kings) विरुद्ध पंजाब किंग्स (Punjab Kings) यांच्यामध्ये रंगणार आहे. चेन्नई सुपर किंग्सला मागील सामन्यामध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. तर दुसरीकडे पंजाब किंग्सलाही पराभवाची चव चाखावी लागली होती. महेंद्र सिंग सिंह धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्त्वात चेन्नई सुपर किंग्सचा संघ मैदानावर उतरणार आहे तर पंजाब किंग्सचा कर्णधार शिखर धवनही (Shikhar Dhawan) दुखापतीतून सावरल्यावर पुन्हा मैदानामध्ये खेळताना दिसणार आहे.

आजचा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर होणार आहे. राजस्थान रॉयल्सकडून पराभव स्वीकारल्यानंतर चेन्नई आणि लखनौकडील पराभवानंतर पंजाब आजचा सामना खेळणार आहेत. चेन्नई सुपर किंग्सचा संघ गुणतालिकेमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे आणि पंजाब किंग्सचा संघ सहाव्या क्रमांकावर आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर आज दुपारी ३.३० वाजता हा सामना रंगणार आहे. दोन्ही संघांना मागील सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं असल्यानं आज दोन्ही संघ विजय मिळवण्याचा प्रयत्न करतील. गेल्या काही वर्षांत चेपॉक स्टेडिअमची खेळपट्टी फलंदाजांसाठी चांगली ठरली आहे. खेळ जसजसा पुढे सरकतो तसतशी खेळपट्टी खूप कोरडी होते आणि याचा फिरकीपटूंना फायदा झाला होतो.

चेन्नई सुपर किंग्सची संभाव्य प्लेइंग ११
ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जाडेजा, महेंद्र सिंह धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), मथीशा पथिराना, तुषार देशपांडे, आकाश सिंह, महेश तीक्षणा

पंजाब किंग्सची संभाव्य प्लेइंग ११
अथर्व तायडे, शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंह, सिकंदर रझा, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहरुख खान, कगिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंह

हे ही वाचा : 

“राज ठाकरे यांनी जसे त्यांच्या काकांवर लक्ष ठेवले तसे मी माझ्या काकांवर लक्ष ठेवेल”, अजित पवारांचे प्रत्युत्तर

वरळीच्या पोद्दार आयुर्वेद महाविद्यालयात विद्यार्थ्याचा मृत्यू

मुंबईकरांनो घराबाहेर पडण्याचा विचारात असाल तर एकदा रेल्वेचे वेळापत्रक नक्की पहा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version