Mumbai Indians Playing XI For IPL 2024 : मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने २०२४ च्या आयपीएल (IPL 2024) लिलावात दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्जीवर (Gerald Coetzee) सर्वाधिक रक्कम खर्च केली. एमआयने ५ कोटी रुपये देऊन कोएत्झीला त्यांच्या संघाचा भाग बनवले. मुंबई संघाने लिलावात एकूण ८ खेळाडूंना खरेदी केले, ज्यात ४ भारतीय आणि ४ परदेशी खेळाडूंचा समावेश होता. एमआयने (MI) ८ खेळाडूंवर १८.७० कोटी रुपये खर्च केले.
कोएत्झीशिवाय मुंबईने श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज नुवान तुषाराला (Nuwan Thushara) ४.८० कोटी रुपयांना खरेदी केले. याशिवाय, मुंबईने ४.६० कोटी रुपये देऊन श्रीलंकेचा आणखी एक वेगवान गोलंदाज दिलशान मदुशंकाचा त्यांच्या संघात समावेश केला, जो २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक बळी घेणारा तिसरा गोलंदाज होता . मुंबईने प्रामुख्याने वेगवान गोलंदाजांवर पैसा खर्च केला. अशा परिस्थितीत या गोलंदाजांना प्लेइंग इलेव्हनमध्येही बसवायला संघाला आवडेल. मात्र, संघात आधीपासूनच बुमराह (Jasprit Bumrah) आणि आकाश मधवालसारखे (Akash Madhwal) स्टार गोलंदाज आहेत. तर शीर्ष क्रमाची सुरुवात संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा (Former captain Rohit Sharma) करेल, जो सलामीची धुरा सांभाळेल. रोहित शर्मासोबत इशान किशन (Ishan Kishan) हा दुसरा सलामीवीर म्हणून दिसणार आहे. यानंतर युवा डावखुरा फलंदाज तिलक वर्मा (Tilak Varma) तिसऱ्या क्रमांकावर दिसू शकतो.
मुंबईच्या मिडल ऑर्डरची सुरुवात स्टार फलंदाज सूर्य कुमार यादवपासून होणार हे मात्र नक्की आहे. सूर्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्या पाचव्या क्रमांकावर आहे. मात्र, परिस्थितीनुसार हार्दिक सहाव्या क्रमांकावरही येऊ शकतो. पण सामान्य परिस्थितीत चांगला फलंदाज असलेला टिम सहाव्या क्रमांकावर दिसू शकतो. त्यानंतर अफगाण वंशाचा अष्टपैलू मोहम्मद नबी (Mohammad Nabi) सातव्या क्रमांकावर येऊ शकतो. नबीकडे वेगवान फलंदाजी करण्याची क्षमता आहे. गोलंदाजी विभागाची सुरुवात फिरकी गोलंदाज पियुष चावलाकडून (Piyush Chawla) होऊ शकते. याशिवाय नुवान तुषारा, जसप्रीत बुमराह आणि जेसन बेहरेनडॉर्फ वेगवान गोलंदाजांच्या भूमिकेत दिसतील.
IPL 2024 साठी मुंबई इंडियन्सचे संभाव्य खेळाडू –
इशान किशन, रोहित शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, टीम डेव्हिड, मोहम्मद नबी, पियुष चावला, नुवान तुषारा, जसप्रीत बुमराह आणि जेसन बेहरेनडॉर्फ.
हे ही वाचा:
“संपूर्ण विश्वातील सर्वात महान मनुष्य,रितेशच्या वाढदिवसानिमित्त जेनेलियाची खास पोस्ट