Tuesday, May 21, 2024

Latest Posts

नबीच्या ‘त्या’ एका स्टोरीमुळे होतोय PANDYA ट्रोल

मागील काही दिवसांपूर्वी मुंबई इंडियन्स या टीमचं रोहित शर्माचं नेतृत्व काढून हार्दिक पांड्याला देण्यात आलं होत. यामुळे हिटमॅनच्या चाहत्यांनी प्रचंड निराशा दर्शवली होती. या एका कारणामुळे तेव्हापासून लोक पांड्याला ट्रोल करत आहेत. त्यात नुकत्याच नबीनं शेअर केलेल्या स्टोरीनं तर आणखीनच खळबळ उडाली आहे.

सध्या आयपीएलची क्रेझ सर्वत्र चालू आहे. देशातील क्रिकेटप्रेमी वेळ काढून मॅचेस पाहत आहे. मागील काही दिवसांपूर्वी मुंबई इंडियन्स या टीमचं रोहित शर्माचं नेतृत्व काढून हार्दिक पांड्याला देण्यात आलं होत. यामुळे हिटमॅनच्या चाहत्यांनी प्रचंड निराशा दर्शवली होती. या एका कारणामुळे तेव्हापासून लोक पांड्याला ट्रोल करत आहेत. त्यात नुकत्याच नबीनं शेअर केलेल्या स्टोरीनं तर आणखीनच खळबळ उडाली आहे.

मुंबई इंडियन्सनं एकामागे एक असे ३ सामने जिंकले आहेत. काल मुंबई इंडियन्सनं पंजाब किंग्सला ९ धावांनी पराभूत केले. आता मुंबई इंडियन्स गुणतालिकेवरती सातव्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्समध्ये गटबाजी असल्याच्या आणि दोन गट असल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी वायरल झाल्या होत्या. रोहित शर्माची कॅप्टनसी काढून ती हार्दिक पांड्याला दिल्यानंतर नेटकऱ्यांनी मॅनेजमेंटवर चांगलीच शेरेबाजी केली होती. काळ झालेल्या सामन्यानंतर मोहम्मद नबीनं एका चाहत्यांची स्टोरी रिपोस्ट केली होती ज्याने अजूनच खळबळ उडाली. कालच्या सामन्यात मोहम्मद नबीनं एकही ओव्हर टाकली नव्हती त्यामुळे क्रिकेटप्रेमी हैराण झाले होते. मोहम्मद नबीनं कालच्या मॅचमध्ये बॉलिंग न दिल्याबद्दल हार्दिक पंड्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपास्थित करणारी एका युजरची स्टोरी ऍड केली होती. काही वेळातच नबीनं ती स्टोरी डिलीट केली. तरीही टीम मध्ये सर्व काही नीट आहे ना असा प्रश्न क्रिकेटचाहत्यांमध्ये निर्माण झाला आहे. शेअर केलेल्या स्टोरीमध्ये ‘तुमच्या कॅप्टनचे काही निर्णय अनाकलनीय आणि आश्चर्याचा धक्का देणारे असतात. नबीला आज एकही ओव्हर देण्यात आली नाही.’ असा त्या युजर ने स्टोरीमध्ये म्हटलं आहे.

नबीनं स्टोरी डिलीट जरी केली असली तरी चाहत्यावर्गानं स्क्रीनशॉट काढून ठेवले होते. म्हणून या गोष्टीवर हार्दिक पांड्या च्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केला जात आहे. मुंबई इंडियन्सची पुढील मॅच जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्स विरोधात होणार आहे.

हे ही वाचा:

Maratha समाजामुळेच Nasik मध्ये ‘नटसम्राट’ Bhujbal Backfoot वर,

गोडसेंचा मार्ग मोकळा पण विजयाचं काय? PM NARENDRA MODI LIVE: ज्यांना कोणी किंमत देत नव्हतं, त्यांना या गरीब मुलाने… Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss