Friday, May 3, 2024

Latest Posts

PM NARENDRA MODI LIVE: ज्यांना कोणी किंमत देत नव्हतं, त्यांना या गरीब मुलाने…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्धा येथे मराठीत बोलून भाषणाला सुरुवात केली. सर्व बंदी आणि भगिनींना माझा ‘जय गुरु’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज यांना नरेंद्र मोदी यांनी वंदन केले. वर्धा येथील तळेगावात नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. आज चित्र एकादशीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सभेत नरेंद्र मोदींनी उपस्थितींना संबोधित केले. वर्ध्यात यायला भाग्य लागतं, भारताला आत्मनिर्भर स्वप्न पूर्ण करायचं आहे.

वर्ध्यात याआधीसुद्धा आलो आहे, पण यावेळी जास्त जनसागर आला आहे. वर्धा ही संतांची भूमी आहे. विकसित भर, विकसित महाराष्ट्र स्वप्न आता दूर नाही. २०१४ च्या आधी देशात नैराश्याचं वातावरण होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना उद्देश्यून प्रार्थना केली की, तुम्ही सर्वजण माझ्यासाठी मोदी आहात. ४ कोटी जनतेला पीएम आवास योजनेचा लाभ मिळाला. ज्यांना कोणी किंमत देत नव्हतं, त्यांना या गरीब मुलाने पूजलं. म्हणून आता तुम्ही जनता मायबाप स्वतःला मोदी समजून बाहेर पडा, आणि जनतेच्या समस्या जाणून घ्या. माझा प्रत्येक क्षण हा जनतेसाठी आहे. मोदींची ‘गॅरन्टी’ हा फक्त ३ अक्षरी शब्द नाही तर २४ तास आणि प्रत्येक क्षण जपला जाणारा दुवा आहे. गॅरन्टी देण्यासाठी हिंमत लागते. पुढील ५ वर्षात ३ कोटी नवी घरं दिली जाणार हे आमच्या जाहीरनाम्यात आम्ही मांडले आहे. असे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

हे ही वाचा:

उन्हाळयात बनवा आंबट गोड कैरीचे वरण राजनीती गेली खड्ड्यात.. Amravati प्रचारसभेत Navneet Rana झाल्या आक्रमक Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss