Friday, May 3, 2024

Latest Posts

वानखेडेबाहेर ‘हिटमॅन’ च्या फॅन्सचा सामन्याआधीच जल्लोष, व्हिडीओ होतोय वायरल!

इंडियन प्रीमिअर लीगच्या (Indian Premier League) (IPL) १७ व्या हंगामाला सुरुवात झाली असून क्रिकेट फॅन्स आता आपल्या आवडत्या फ्रेंचायझींना आणि खेळाडूंना सपोर्ट करत आहे. अश्यातच मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) या पाच वेळा आयपीएलचे जेतेपद जिंकलेल्या संघाला यावर्षी मात्र फॅन्सच्या रोषाला मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागत आहे. आयपीएलमधील सर्वाधिक फॅन्स असलेल्या फ्रेंचायझी पैकी एक असलेल्या मुंबई इंडियन्सचा सोमवारी, (१ एप्रिल) घरच्या मैदानावर पहिला सामना होणार आहे. याआधी झालेल्या दोन्ही सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागला होता. या दोन्ही सामन्यात मुंबई इंडिअन्सच्या फॅन्सनी कर्णधारपदी नव्याने नियुक्त झालेल्या हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याला प्रचंड प्रमाणात ट्रोल केले होते. अश्यातच, मुंबईच्या घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर होणार असलेल्या सामन्याआधीच फॅन्स हार्दिकला ट्रोल करत असल्याच्या व्हिडीओज वायरल होत आहेत. तसेच, फॅन्सनी आधीचा कर्णधार आणि स्टार खेळाडू रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या घोषणांनी स्टेडियम परिसर दणाणून सोडला आहे.


आयपीएलचा यंदाचा हंगाम सुरु होण्याआधी मुंबई इंडिअन्सच्या मॅनॅजमेंटने रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवत गुजरात टायटन्स या संघाचा कर्णधार असलेल्या हार्दिक पांड्याला संघात घेतले. याशिवाय, त्याला मुंबईचे कर्णधारपदहि देऊ केले. यामुळे, मुंबई इंडियन्स आणि रोहित शर्माचे कट्टर फॅन्स चांगलेच संतापले. त्यांनी सोशल मीडियावर हार्दिकला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगला सुरुवात केली. मुंबई सुरवातीचे दोन सामने हरल्यानंतर या ट्रोलिंगमध्ये आणखीनच वाढ झाली. अश्यातच, मुंबई आपला पहिला घरचा सामना खेळणार आहे. त्यापूर्वी मुंबईच्या चाहत्यांनी स्टेडियम बाहेर गर्दी केली असून हार्दिक पांड्याला ट्रोल करणाऱ्या आणि रोहित शर्माचा जयघोष करणाऱ्या व्हिडीओज सोशल मीडियावर वायरल होत आहेत.


याआधी अहमदाबाद आणि हैदराबाद येथे झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये चाहत्यांनी हार्दिकला प्रचंड प्रमाणात ट्रोल केले. या दोन्ही सामन्यांत मुंबईला हार पत्करावि लागली. आता, मुंबईतही मॅच सुरु होण्याआधीच हार्दिकला ट्रोल केले जात आहे. त्यामुळे मॅच सुरु झाल्यानंतर हार्दिकला मोठ्या प्रमाणात फॅन्सच्या रोषाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा:

खेळाडू Hardik Pandya ने घेतला ब्रेक? सामन्यात असणार की नाही?

कर्णधार हार्दिक पांड्याला चाहत्यांनी केले ट्रोल, पोस्ट शेअर करत सोनू सूदने दिली प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss