Friday, May 3, 2024

Latest Posts

मुंबईचा सलग तिसरा पराभव, काय म्हणाला Hardik Pandya?

आयपीएलच्या (Indian Premier League) (IPL) यंदाच्या हंगामात आपल्या घरच्या मैदानावर पहिलाच सामना खेळात असलेल्या मुंबई इंडिअन्सला (Mumbai Indians) पराभवाचा सामना पत्करावा लागला आहे. सोमवारी, (१ एप्रिल) मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे झालेल्या या सामन्यात राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) मुंबईवर ६ गडी राखून विजय मिळवला. या पराभवामुळे पॉईंट्स टेबलमध्ये मुंबई शेवटच्या स्थानावर असून अजूनही मुंबईच्या विजयाची पाटी कोरीच राहिली आहे. याआधी, गुजरात टायटन्स आणि सनरायजर्स हैदराबाद या संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबईला हार पत्करावी लागली होती. कर्णधार हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईला सलग तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मुंबईला सुरुवातीलाच तीन मोठे धक्के बसले. कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर शून्यावर बाद झाला. त्यानंतर, फलंदाजीला आलेल्या नमन धीरला देखील बोल्टने शून्यावर बाद केले. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून फलंदाजीला उतरलेल्या डेवाल्ड ब्रेवीसलादेखील मैदानावर इम्पॅक्ट पाडता आला नाही. त्यालादेखील बोल्टच्या झंजावातापुढे टिकता आले नाही. बोल्टने त्यालाही भोपळा फोडू दिला नाही. एका बाजूने फलंदाजी करत असलेल्या ईशान किशनचा काटा नांद्रे बर्गरने दूर केला. त्यानंतर, तिलक वर्मा आणि कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) aयांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. हार्दिकने २१ चेंडूत ३४ तर तिलकने २९ चेंडूत ३२ धावांची खेळी केली. या दोघांचाही अडसर युजवेंद्र चहलने दूर केला. मुंबईला २० षटकांत ९ बाद १२५ धावा करता आल्या.

१२६ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या राजस्थान रॉयल्सची सुरुवात देखील फारशी चांगली झाली नाही. सलामीला आलेल्या यशस्वी जयस्वालची विकेट माफाकाने घेतली. सलामीवीर जोस बटलर आणि कर्णधार संजू सॅमसन यांना फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. एकावेळेस राजस्थानची अवस्था ३ बाद ४८ अशी होती. त्यानंतर, फलंदाजीला आलेल्या रियाण पारंगने डाव सावरला. राजस्थानकडून रियान परागने नाबाद ५४ धावांची अर्धशतकी खेळी खेळून राजस्थानला १६ व्या षटकात विजय मिळवून दिला. मुंबईकडून आकाश मढवालने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर, माफाकाला १ विकेट मिळाली. जसप्रीत बुमराह, कोइत्जे आणि चावलाची विकेटची पाटी कोरीच राहिली.

कर्णधार पांड्याची प्रतिक्रिया

सामन्यानंतर बोलताना कर्णधार हार्दिक पांड्याने आपले मत व्यक्त केले. तो म्हणाला, “आजची एक कठीण रात्र आहे. आम्हाला हवी तशी सुरुवात मिळाली नाही. आम्ही १५०-१६० धावा करण्याच्या स्थितीत नव्हतो. पण, माझ्या विकेटमुळे राजस्थानने कमबँक केले. आम्हाला अश्या विकेटची अपेक्षा नव्हती. एक संघ म्हणून आम्हाला खात्री आहे कि आम्ही चांगली कामगिरी करू.”

हे ही वाचा:

खेळाडू Hardik Pandya ने घेतला ब्रेक? सामन्यात असणार की नाही?

कर्णधार हार्दिक पांड्याला चाहत्यांनी केले ट्रोल, पोस्ट शेअर करत सोनू सूदने दिली प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss