Friday, March 29, 2024

Latest Posts

जागतिक तिरंदाजी विश्‍वकपमध्ये भारताच्या दोन तिरंदाजानी अचूक बाण सोडून अंतिम फेरीत प्रवेश

जागतिक तिरंदाजी विश्‍वकप (World Archery Championships) मध्ये भारताचे तिरंदाज प्रथमेश जावकर (Prathamesh Javakar) व अवनीत कौर (Avneet Kaur) हे उत्तम कामगिरी करत आहेत.

जागतिक तिरंदाजी विश्‍वकप (World Archery Championships) मध्ये भारताचे तिरंदाज प्रथमेश जावकर (Prathamesh Javakar) व अवनीत कौर (Avneet Kaur) हे उत्तम कामगिरी करत आहेत. त्या दोघांनीही वैयक्तिक कंपाऊंड प्रकाराची उपांत्य फेरी गाठली आहे. या दोघांनीही अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे त्यामुळे त्यांना वैयक्तिक प्रकारामध्ये आता त्यांना पहिले पदक जिंकता येणार आहे. एकीकडे रिकर्व्ह प्रकारातील सांघिक गटामध्ये अपयश आल्यामुळे कंपाऊंड प्रकारात भारतीयांनी अचूक बाण सोडला.

प्रथमेश जावकर हा १९ वर्षाचा आहे या १९ वर्षाच्या प्रथमेश जावकरने उपांत्यपूर्व फेरीच्या लढाईमध्ये दक्षिण कोरियाच्या योंगही चोई याच्यावर १४९-१४८ अशी मात केली आणि अंतिम चारमध्ये प्रवेश केला. आता त्याच्यासमोर अंतिम फेरीमध्ये इस्तोनियाच्या रॉबिन जातमा याचे आव्हान असणार आहे. अवनीत कौर ही १८ वर्षाची आहे या १८ वर्षाच्या अवनीतने अव्वल मानांकित कोरियाची ओह युह यून हिच्यावर रोमहर्षक विजय मिळवला आणि उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केला आहे. अवनीत हिने मेक्सिकोच्या डॅफने क्विनटेरो हिच्यावर १४७-१४४ अशी मात केली आणि पदक पटकावण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे.

हे ही वाचा : 

RCB vs SRH, कोहली मारणार बाजी की शेवटच्या सामन्यामध्ये सनरायजर्स हैदराबाद होणार विजयी

भारतीय स्टेट बँकेने ग्राहकांना दिले भामट्यांकडून खबरदारी बाळगण्याचे आव्हान

शुभमन गिलच्या नव्या चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss