IPL 2024 कुठे होणार? भारत की यूएई ?

IPL 2024 कुठे होणार? भारत की यूएई ?

भारतातील क्रिकेट प्रेमींसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे आयपीएल २०२४ (IPL 2024) मध्ये असणारे सर्व सामने फक्त भारतामध्येच आयोजित करण्यात येणार आहेत. त्यामुळे भारताच्या स्टेडियममध्ये सर्वांना आयपीएलचा सामना पाहता येणार आहे. आयपीएल (IPL) चा दौरा यूएई (UAE) मध्ये असणार आहे, असा दावा यापूर्वी करण्यात आला होता. परंतु, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अर्थात बीसीसीआय (BCCI) चे सचिव जय शहा यांनी आयपीएल (IPL) परदेशात स्थलांतरित होणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

आयपीएल २०२४ (IPL 2024) चे अध्यक्ष अरुण धुमाळ यांनी १९ एप्रिल ते १ जून या दरम्यान देशात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमुळे आयपीएल २०२४ (IPL 2024) यूएई (UAE) मध्ये होईल, अशी माहिती फेटाळली आहे. निवडणुका असल्यामुळे आयपीएल (IPL) होईल, अशा अफवा पसरवल्या जात होत्या. आयपीएल २०२४ (IPL 2024) याबद्दलची माहिती जय शाह यांनी दिली. भारतामध्ये १९ एप्रिल ते १ जून या दरम्यान लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. २२ मार्च रोजी चेन्नई या ठिकाणी एम.एस.धोनी यांच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू यांच्यातील सामन्याने आयपीएल २०२४ ची सुरुवात होणार आहे. आतापर्यंत पहिल्या दोन आठवड्यांमध्ये कोणते सामने असणार आहेत, याबद्दलचे वेळपत्रक सुद्धा जाहीर करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांचा शिंदे गटामध्ये प्रवेश, पक्ष प्रवेश करताना पाडवींना अश्रू अनावर

जरासा वेळ लागला पण मी आलो तर दोन्ही पक्ष फोडूनच आलो, उत्तर द्यावं लागतच पण, वेळ पाहावी लागते; देवेंद्र फडणवीस

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version