२००० रुपयांची नोट होणार बंद! नेमकी कधी आणि का आली होती चलनात?

आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. नुकतंच भारतीय रिझर्व्ह बँकेने एक मोठा निर्णय हा दिला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २ हजाराच्या नोटांबद्दल एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे.

२००० रुपयांची नोट होणार बंद! नेमकी कधी आणि का आली होती चलनात?

आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. नुकतंच भारतीय रिझर्व्ह बँकेने एक मोठा निर्णय हा दिला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २ हजाराच्या नोटांबद्दल एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारकडून २ हजारांची नोटांवर बंदी केली आहे. २ हजाराच्या या नोटांची छपाई बंद करण्यात आली आहे. परंतु या नोटा अद्याप बंद झालेल्या नाहीत. ३० सप्टेंबर पर्यंत मात्र या नोटा चलनात वैध राहतील. आरबीआयने क्लीन नोट पॉलिसी अंतर्गत हा निर्णय घेतला आहे.

भारत सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी ५००आणि १००० रुपयांची नोट बंद करण्याच निर्णय घेतला होता. त्याच दिवशी देशाच्या पंतप्रधानांनी म्हणजेच नरेंद्र मोदी यांनी जनतेला रात्री ८ वाजता संबोधित करताना हा निर्णय जाहीर केला होता. रात्री १२ नंतर ५०० आणि १००० रुपयांचा नोटा चलनातून बाद झाल्या होत्या. त्यानंतर सरकारने नवीन नोटा चलनात आणल्या होत्या. यात ५०० आणि नवीन २००० रुपयांची नोट सुरु केली होती.

परंतु आता सात वर्षानंतर दोन हजार रुपयांची नोट बंद करण्याच निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. ही नोट ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत चलनात असणार आहे. त्यानंतर ही नोट चलनातून बाद होणार आहे.भारतीय रिझर्व्ह बँक दिनांक ३० सप्टेंबरपर्यंत २००० नोटा परत घेणार आहे. रिझर्व्ह बँकेकडून ३० सप्टेंबपर्यंत २००० नोटा बँकेत जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या २००० रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी २३ मे ते ३० सप्टेंबर अशी मुदत दिली आहे. तसेच गेल्या अनेक दिवसांपासून या २ हजाराच्या नोटा बंद होतील,अशी जोरदार चर्चा सुरु होत्या.तसेच सोशल मीडियावर देखील या बाबत वारंवार चर्चा केल्या जात होत्या. पर्णातू आज अखेर रिझर्व्ह बँक ने या बाबत आदेश दिला आहे. तसेच या नोटा बदलत असताना एकावेळी फक्त २ हजार रुपयांच्या नोटा २० हजार रुपयांपर्यंत बदलू शकता. यासाठी बँकांना विशेष खिडकी उघडावी लागणार आहे

हे ही वाचा : 

तुमच्याकडे 2000 रुपयांच्या खूप नोटा आहेत का? तर घाबरू नका… जाणून घ्या नक्की काय करायचं?

Doormat कशा करायच्या clean | Lifestyle

Western Railway ची भन्नाट आईडिया, चक्क मिनी पवनचक्क्यां द्वारे केली वीज निर्मिती!

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version