Friday, March 29, 2024

Latest Posts

आजपासून 2000 रुपयांची पाठवणी सुरु

दिनांक १९ मे २०२३ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) २ हजार रुपयांची नोट चलनातून काढून टाकण्यासंदर्भात मोठी घोषणा ही केली होती.

दिनांक १९ मे २०२३ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) २ हजार रुपयांची नोट चलनातून काढून टाकण्यासंदर्भात मोठी घोषणा ही केली होती. ही घोषणा झाली त्यावेळेस या २००० रुपयांच्या नोटा बदलण्यासंदर्भात देखील माहिती ही देण्यात आली होती. परंतु या या घोषणेनंतर अनेक लोकांमध्ये पुन्हा संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. २०१६ मध्ये केंद्र सरकारने अचानक नोटबंदी केली आणि त्यामुळे नागरिकांमध्ये तणावाचे वातावरण हे निर्माण झाले होते. नागरिकांना लांबच लांब रांगेत उभे रहावे लागत होते. परंतु या वेळेस नोटा बदलून घेण्यासाठी ३० सप्टेंबरची मुदत देण्यात आली आहे.

आज पासून संपूर्ण देशात २००० रुपयांच्या या गुलाबी नोटेच्या पाठवणी महोत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे. ३० सप्टेंबर नंतर देशात २००० रुपयांची नोट ही पूर्णपणे बंद होणार आहे. परंतु ही नोट बदलण्यासाठी अजूनही ४ महिन्याचा अवधी हा देण्यात आला आहे. तसेच गेल्या वर्षभरापासून अनेकांना या २००० रुपयांच्या नोटा दिसतच न्हवत्या . तसेच या संदर्भात सोशल मीडियावर देखील अनेक पोस्ट व्हायरल होत होत्या. देशात ३० सप्टेंबरपर्यंत या नोटा बदलता (Exchange Of Notes) येतील.

आज पासून तुम्ही बँकेत जाऊन ही २००० रुपयांची नोट बदलून घेऊ शकता. यासोबतच तुम्ही आरबीआयच्या १६ प्रादेशिक कार्यालयात जाऊन नोट बदलून घेऊ शकता. तसेच तुम्ही एकावेळी फक्त २० हजाराच्या १० नोटा बदली करू शकता. नोटा बदलण्याची प्रक्रिया २३ मे २०२३ पासून म्हणजेच आज सुरू होत आहे. तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन २००० रुपयांची नोट जमा केली तर त्यावर कोणतेही बंधन नाही, परंतु तुमच्या खात्याचे केवायसी असणे आवश्यक आहे. तुम्ही बँकेचे ग्राहक नसले तरीही तुम्ही नोटा बदलून घेऊ शकता. तर ५०,००० रुपयांपेक्षा अधिकची रक्कम जमा करण्यासाठी तुम्हाला पॅनकार्ड दाखवावे लागेल आणि त्याचा तपशील द्यावा लागेल. नियमानुसार, एका मर्यादेपेक्षा अधिकची रोख जमा केल्यास बँका शुल्क आकारतील.

तसेच या २००० रुपयांच्या नोटा तुम्ही घरी बसूनही नोटा बदलू शकता. तुम्हाला बँकेत जाऊन नोटा बदलणे शक्य नसेल तर तुम्ही घरी बसून नोटा बदलून घेऊ शकता. बँक मित्र तुमच्या घरी येऊन नोटा बदलतील, असे आरबीआयने म्हटले आहे. या सुविधेद्वारे तुम्ही दररोज ४,००० रुपये म्हणजेच २,००० रुपयांच्या दोनच नोटा बदलू शकता.

हे ही वाचा:

पंतप्रधान सुद्धा जनतेतून निवडा, अजित पवारांची मागणी

आम्ही जमिनीवर चालणारे लोक,हवेत कोण आहे याची त्यांनी तपासणी करावी, फडणवीसांच पवारांना प्रतिउत्तर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss