Friday, April 26, 2024

Latest Posts

पंतप्रधान सुद्धा जनतेतून निवडा, अजित पवारांची मागणी

सध्या महाराष्ट्रामध्ये राजकारण हे चांगलंच तापल्याच दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde Fadnavis Govt) महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि आताचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांना छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्यावर केलेल्या विधानावर चांगलाच घेरण्याचा प्रयत्न केला. आज अजित पवार यांनी एका कार्यक्रमात संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. सध्या सोयीचं राजकारण सुरु आहे. भारत घटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी (Dr. Babasaheb Ambedkar) जे संविधान आपल्याला दिलं, त्यात सर्वांना समान अधिकार दिलाय, त्यात बहुमताला प्राधान्य देण्यात आलंय. काही-काही गावांत सरपंच एका विचाराचा आणि सदस्य बाॅडी एका विचाराची असते, त्यामुळं ग्रामपंचायतीचा खेळखंडोबा होतो, असं स्पष्ट मत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी व्यक्त केलं.

अजित पवार सध्या कौल्हापूर दौऱ्यावर (Kaulhapur tour) आले आहेत.या दरम्यान त्यांनी अनेक पदाधिकाऱ्यांसोबत सोबत बैठका सुद्धा घेतल्या आहेत. दौऱ्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांच्या सत्कारप्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री, पंतप्रधानांचीही थेट जनतेतून निवडा व्हावी, अशी मागणी केली.

शरद पवार (Sharad Pawar) साहेब आणि बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी एकमेकांविरुध्द एवढी टीका टिप्पणी करायचे, पण एकमेकांशी भेटल्यानंतर गप्पाही मारायचे. आम्ही कोणी शत्रू नाही आहोत. आपली विचारधारा वेगवेगळी असू शकते. मतमत्तांतर वेगळं असू शकतं. घरामध्ये देखील तसं होऊ शकतं, त्यामुळं राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नाही. नवनियुक्त संरपंचांनीही गावात चांगली कामं करावीत, असं आवाहन अजित पवार यांनी केलं.

हे ही वाचा:

आम्ही जमिनीवर चालणारे लोक,हवेत कोण आहे याची त्यांनी तपासणी करावी, फडणवीसांच पवारांना प्रतिउत्तर

भारताने सॉफ्टवेअर उत्पादनांचे केंद्र बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss