Friday, April 26, 2024

Latest Posts

आम्ही जमिनीवर चालणारे लोक,हवेत कोण आहे याची त्यांनी तपासणी करावी, फडणवीसांच पवारांना प्रतिउत्तर

आम्ही जमिनीवर चालणारे लोक आहोत,हवेत कोण आहे, याची तपासणी त्यांनी केली पाहिजे', असं म्हणत प्रत्युत्तर दिल आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. त्याचबरोबर त्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटावर पाय जमिनीवर ठेवण्याचा सल्ला देत टीका केली. पवारांच्या या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ,’आम्ही जमिनीवर चालणारे लोक आहोत,हवेत कोण आहे, याची तपासणी त्यांनी केली पाहिजे’, असं म्हणत प्रत्युत्तर दिल आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आज कोल्हापूरमध्ये आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील अनेक विषयांवर भाष्य केलं. तसेच शिंदे गटाच्या हाती सत्ता आली पण त्यांनी जमिनीवर पाय ठेवण्याचा सल्ला दिला. शरद पवार म्हणाले,”“सत्ता हातात आल्यानंतर जमिनीवर पाय ठेवून वागायचं असतं. पण अलिकडे मी बघतो की ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांची वेगवेगळी विधानं असतात. यांना तुरुंगात घालीन, त्यांचा जामीन रद्द करीन ही काही राजकीय नेत्यांची कामं नाहीत. पण इतकी टोकाची भूमिका काही राजकीय नेत्यांनी घेतली आहे”, असं शरद पवार म्हणाले होते.

शरद पवार यांच्या या विधानावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोखठोक प्रतिउत्तर दिल आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले,”आम्हाला आमची जमीन माहिती आहे. आम्ही जमिनीवर चालणारे लोक आहोत. जमिनीवरच्या लोकांशी आमचा संपर्क आहे. त्यामुळे मला वाटतं की नेमकं हवेत कोण आहे, याची तपासणी त्यांनी केली पाहिजे,” असा सल्ला फडणवीसांनी दिल आहे.

दरम्यान, सीमाप्रश्नाविषयी महाराष्ट्राची बाजू मांडण्यात सरकार कमी पडत असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. त्यावर ही देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं. यावेळी फडणवीस म्हणाले,“सरकार खूप गंभीर आहे. आम्ही हरीश साळवेंशी संपर्क साधला आहे. ते आपली केस मांडतील अशी मला आशा आहे. आपली केस मजबूत आहे”, असं फडणवीस म्हणाले.

तसेच, सामनामधील संजय राऊतांच्या रोखठोक या सदरामध्ये त्यांनी केलेल्या टीकेबाबत देखील त्यांना विचारणा केली. त्यावर उत्तर देण्यास देवेंद्र फडणवीसांनी नकार दिला. त्यावेळी “सामनावर मी बोलत नाही. सामना हा काही पेपर नाही”, असं ते म्हणाले.

हे ही वाचा : 

भारताने सॉफ्टवेअर उत्पादनांचे केंद्र बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Cold Wave मुळे देशातील अनेक राज्य त्रस्त, दिल्लीसह ‘ह्या’ राज्यांना बसणार थंड हवेचा फटका

संभाजी महाराज स्वराजरक्षकच, शरद पवार यांचं स्पष्ट मत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss