Saturday, July 27, 2024

Latest Posts

24 DECEMBER: राष्ट्रीय ग्राहक दिन, काय आहेत ग्राहकांचे अधिकार?

मिळालेल्या हक्कानुसार ग्राहकांनी जर आपलं योग्य ते मत मांडलं आणि हवं ते उत्पादन निवडून फसवणूक तक्रार केली तर यामुळे ग्राहकांची फसगत होणे कुठेतरी थांबू शकेल किंवा ते आटोक्यात येऊ शकेल.

एखाद्या वस्तूचा वापर करण्यासाठी आवश्यक पैसे देऊन ती वस्तू विकत घेणारी व्यक्ती म्हणजे ‘ग्राहक’ अशी सरळ, साधी आणि सोपी व्याख्या ग्राहकाची केली जाते. ग्राहक हा भांडवलशाहीमध्ये आर्थिक व्यवस्थेचा एक मुख्य घटक आहे. आज भारत देशभरात म्हणजेच २४ डिसेंबरला ‘राष्ट्रीय ग्राहक दिन’ (NATIONAL CONSUMER DAY) साजरा केला जातो. ग्राहक चळवळीच्या माध्यमातून २४  म्हणून साजरा केला जातो. ग्राहकांना त्यांचे अधिकार आणि कर्तव्य यांची बऱ्याचदा माहिती नसते. ग्राहकांच्या अधिकाऱ्यांची त्यांना जाणीव व्हावी आणि संपूर्ण माहिती मिळावी, या अनुषंगाने जागतिक तसेच राष्ट्रीय पातळीवर ग्राहक दिन साजरा केला जातो. ग्राहकांना त्यांच्या हक्कांची आणि जबाबदारीची मुख्यतः जाणीव करून देणे, हाच या दिवसामागचा उद्देश आहे. ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आल्यानंतर ग्राहकांनी जास्तीत-जास्त वापर केला पाहिजे. म्हणूनच, १९९१, १९९३, २००२ आणि २०२० मध्ये या कायद्यात सुधारणा करण्यात आली.

राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या दिवशी ग्राहकांच्या जनजागृतीसाठी नागरी पुरवठा विभाग, वजन मापे निरीक्षक कार्यालय, अन्न व औषध प्रशासन विभाग यांच्यामार्फत प्रबोधन, प्रात्यक्षिक तसेच व्याख्याने आणि प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. दरवर्षी केंद्र व राज्य सरकारच्या ग्रहण संरक्षण विभागातर्फे एक थीम  ठरवली जाते आणि त्यानुसार ग्राहक दिन साजरा केला जातो.
२००५  मध्ये ‘जागो ग्राहक जागो’ भारत सरकारच्या ग्राहक आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अंतर्गत ग्राहक व्यवहार विभागातर्फे सुरू करण्यात आलेली एक जागरूकता मोहीम होती. त्या मोहिमेमुळेच आज अनेक नागरिकांमध्ये त्यांच्या हक्कांविषयी अधिकारांविषयी जाणीव निर्माण होण्यासाठी मदत झाली आहे.

भारतातील ग्राहकांना माहितीचा हक्क, सुरक्षेचा हक्क, मत मांडण्याचा हक्क, निवड करण्याचा हक्क तसेच तक्रार करून निवारण करण्याचा हक्क मिळाला आहे. त्यामुळे ग्राहकांनी शिक्षणाच्या जोरावर या हक्कांचे पालन करून आपल्याला जाणवणाऱ्या समस्या आहेत त्यांचे निवारण करणे गरजेचे ठरते. मिळालेल्या हक्कानुसार ग्राहकांनी जर आपलं योग्य ते मत मांडलं आणि हवं ते उत्पादन निवडून फसवणूक तक्रार केली तर यामुळे ग्राहकांची फसगत होणे कुठेतरी थांबू शकेल किंवा ते आटोक्यात येऊ शकेल.

हे ही वाचा:

Christmas Wish 2023, ख्रिसमस निम्मित तुमच्या प्रियजनांना व्हाट्सअँपद्वारे द्या खास शुभेच्छा

भारतातील ‘या’ ठिकाणी ख्रिसमस सण मोठ्या धामधुमीत होतो साजरा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss