Wednesday, February 28, 2024

Latest Posts

महिना ८ हजाराची चाकरी ते थेट ७२ कोटींच्या पॅकेजपर्यंत मजल

२०२३ हे वर्ष ब्रोकिंग फर्म Zerodha चे सह-संस्थापक निखिल कामथ यांच्यासाठी उत्तम वर्ष ठरले. नेट वर्थमध्ये वाढ झाल्यामुळे, फोर्ब्सने (Forbe's) नुकतेच २०२३ मध्ये जगातील सर्वात श्रीमंत भारतीय अब्जाधीशांच्या यादीत निखिल कामथ यांचा समावेश केला

झेरोधा (Zerodha) या नावाला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. संस्थापक निखिल कामथ (Nikhil Kamath) आणि नितीन कामथ (Nithin Kamat) हे देशातील सर्वात श्रीमंत लोकांपैकी आहेत. अलीकडेच एका अहवालात दोन्ही भावांना 2022-23 या आर्थिक वर्षात मिळालेल्या पगाराबद्दल सांगण्यात आले आहे आणि त्यानुसार प्रत्येकाला वार्षिक ७२-७२ कोटी रुपये पगार मिळाला आहे. पण निखिल कामथ यांनी आपल्या करिअरची सुरुवात फक्त 8,000 रुपये मासिक पगारातून केली होती. ८ हजार रुपयांपासून त्यांचा ६ वर्षात ७२ कोटी वार्षिक पगारांपर्यंत प्रवास झाला आहे.

२०२३ हे वर्ष ब्रोकिंग फर्म Zerodha चे सह-संस्थापक निखिल कामथ यांच्यासाठी उत्तम वर्ष ठरले. नेट वर्थमध्ये वाढ झाल्यामुळे, फोर्ब्सने (Forbe’s) नुकतेच २०२३ मध्ये जगातील सर्वात श्रीमंत भारतीय अब्जाधीशांच्या यादीत निखिल कामथ यांचा समावेश केला. या फोर्ब्सच्या यादीत ते सर्वात तरुण अब्जाधीश म्हणून उदयास आले आहेत. त्यांच्या पगाराची आकडेवारी Entrackr ने एका अहवालात सादर केली आहे, त्यानुसार निखिल कामथ यांना गेल्यावर्षी एकूण ७२ कोटी रुपये वार्षिक पगार मिळाला. त्यानुसार एका महिन्याचा पगार सहा कोटी रुपये येतो. अहवालानुसार, दोन्ही भावांना 195.4 कोटी रुपयांची भरपाई मिळाली आहे.

८००० रुपयांच्या पगारापासून सुरुवात
झिरोधाचे सह-संस्थापक निखिल कामथ, ज्यांना वार्षिक ६ कोटी रुपये आणि ७२ कोटी रुपये पगार मिळतो. त्यांना कठोर परिश्रमातून यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी ओळखले जाते. ८००० रुपयांच्या नोकरीपासून ते अब्जाधीश होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास खूप रंजक आहे. आपल्या करिअरच्या प्रवासाबद्दल बोलताना निखिल कामथ यांनी ह्युमन्स ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, त्याने वयाच्या १७ व्या वर्षी काम करायला सुरुवात केली. त्यांची पहिली नोकरी एका कॉल सेंटरमध्ये होती, जिथे त्यांना फक्त आठ हजार रुपये पगार मिळत होता.

शेअर मार्केटच्या वाटेने नशीब बदलले
कॉल सेंटरमध्ये काम करत असताना निखिल कामथ यांच्या मनात एक नवीन कल्पना घोळायला सुरुवात झाली. त्यानंतर काही वेगळे नियोजन सुरू झाले आणि त्याअंतर्गत पावले टाकत त्यांनी मुंबईच्या दलाल स्ट्रीटचा रस्ता धरला. त्यांचा श्रीमंत होण्याचा प्रवासही शेअर मार्केटमधील ट्रेडिंगपासून सुरू झाला होता. निखिल कामथ यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा त्यांनी शेअर ट्रेडिंग सुरू केली तेव्हा त्यांनी ते गांभीर्याने घेतले नाही. मात्र, वर्षभरातच त्यांना बाजारपेठेचे मूल्य कळले आणि त्यांनी पूर्ण लक्ष केंद्रित केले. यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही, त्यांची संपत्ती इतकी झपाट्याने वाढली की आज ते देशातील अब्जाधीशांमध्ये सामील झाले आहेत.

झेरोधाची सुरुवात अशी झाली?
नोकरी सोडल्यानंतर निखिल कामथ यांनी त्यांचा मोठा भाऊ नितीन कामथ यांच्यासोबत कामथ असोसिएट्सची सुरुवात केली आणि त्याद्वारे ते शेअर मार्केटमधील व्यापाराशी संबंधित काम करायचे. यानंतर २०१० मध्ये दोन्ही भावांनी मिळून झेरोधाची सुरूवात केली. त्यांच्या आतापर्यंतच्या प्रवासाबाबत निखिल यांनी सांगितले की, त्यांच्या संघर्षातून त्यांना काही गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यांच्या मते आज मी कोट्यधीश झालो असलो तरी यानंतरही काहीही बदललेले नाही. आजही मी दिवसाचे 85 टक्के काम करतो आणि माझ्या आयुष्यात एक भीती असते की या सगळ्या गोष्टी चुकल्या तर काय होईल?

Latest Posts

Don't Miss