Wednesday, May 15, 2024

Latest Posts

उबाठानंतर आता आपच्या ‘प्रचार गीत’ वर निवडणूक आयोगाची टांगती तलवार

"आम आदमी पार्टी"च्या प्रचार गीतावर देखील आयोगाने "आप" ला नोटीस पाठवली आहे.

LOKSABHA ELECTION 2024 च्या पार्श्वभूमीवर अनेक पक्षांकडून “प्रचार गीत” जाहीर करण्यात आले. शिवसेनेत फूट पडल्यामुळे “ठाकरे गट” आणि “शिंदे गट” या दोन्ही गटाने आपले प्रचार गीत प्रसिद्ध केले. “जय भवानी, जय शिवाजी” असा उल्लेख असल्याने निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाच्या (Uddhav Thackeray)प्रचार गीतावर आक्षेप घेतला आहे. निवडणूक आयोगाने २४ एप्रिल २०२४ ला ठाकरे गटाला नोटीस बजावली. त्यामुळे निवडणूक आयोगाची टांगती तलवार ठाकरे गटाच्या प्रचार गीतावर आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या (Uddhav Thackeray)प्रचारगीतावर निवडणुक आयोगाने आक्षेप घेतल्यानंतर आता “आम आदमी पार्टी”च्या (Aam Admi Party )प्रचार गीतावर देखील आयोगाने “आप” ला नोटीस पाठवली आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी तयार करण्यात आलेले गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाने आम आदमी पक्षाला (आप) मनाई केली आहे. हे प्रचार गीत ‘आप’चे आमदार दिलीप पांडे यांनी लिहिले आहे.

काही दिवसांपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीचे प्रचार गीत प्रसिद्ध झाले. कथित मद्य घोटाळाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) हे दिल्लीतील तिहार तुरुंगात आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांना अटक करण्यात आलेले काही व्हिडिओ प्रचार गीतात असल्याने निवडणूक आयोगाने प्रचार गीत वापरण्यास मनाई केली आहे.’तुरुंगाचे उत्तर मतांद्वारे’ असा या प्रचार गीताचा आशय आहे. निवडणूक आयोगाच्या नोटिशीनुसार या गाण्याद्वारे सत्ताधारी पक्ष आणि तपास यंत्रणांची खराब प्रतिमा दाखवण्यात आली आहे.

आयोगाच्या नोटीसीनंतर मंत्री आतिशी(Aatishi) यांनी पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी, “इतिहासात पहिल्यांदाच निवडणूक आयोगाने एखाद्या पक्षाच्या प्रचारगीतावर बंदी घातल्याचा प्रकार घडला.या प्रचारगीतात कुठेही भाजपाचा उल्लेख नाही. त्याचबरोबर या गीतातून कुठेही आचारसंहितेचा भंग होत नाही. भाजपाकडून झालेल्या आचारसंहिता भंगांच्या प्रकरणात निवडणूक आयोग कोणतीही कारवाई करताना दिसत नाही. ही भाजपाची हुकूमशाही आहे. या विरोधात कोणी बोलले तर ते चुकीचे ठरते. लोकशाही धोक्यात आली असल्याचे यातून दिसून येते.” असे वक्तव्य केले.

दोन मिनिटाच्या या प्रचार गीतात असलेल्या ‘तुरुंगाचे उत्तर मतांद्वारे’ या वाक्याला आयोगाने आक्षेप घेतला आहे. त्यामुळे दिल्लीत आपचे कार्यकर्ते भाजप (BJP)आणि आयोगाच्या (Election Commission )विरोधात आक्रमक झाले आहेत. मात्र, भाजपा आपल्याला हवा तसा प्रचार उघडपणे करत असताना सरकारला निवडणूक आयोगाला पुढे करून केवळ विरोधी पक्षांना प्रचारही करू द्यायचा नाही का, असा प्रश्‍न विचारला जात आहे.

हे ही वाचा:

Sadabhau Khot यांच्या Sharad Pawar यांच्यावरील ‘त्या’ वक्तव्याचा Rohit Patil यांनी घेतला चांगलाच समाचार

Sonu Sood चे WhatsApp बंद? कारण काय?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss