Sunday, May 19, 2024

Latest Posts

एकच परिवारात तीन पिढ्यांमध्ये समाजसेवेचा वारसा पहिल्यांदी बघितला – अमित शहा

जीवनात एवढी गर्दी मी कधीच पाहिली नसल्याचे मत गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केलं. तुमच्या सर्वांच्या मनात आप्पासाहेब यांच्याबद्दल किती सन्मान आहे समजत असल्याचे शाह म्हणाले. त्याग, समर्पण आणि सेवेच्या माध्यमातून आप्पासाहेबांनी मोठं काम केलं आहे. समाजसेवेचा संस्कार तीन पिढ्यात राहतो हे मी प्रथमच पाहत आहे. आप्पासाहेबांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सरकारने लाखो लोकांना प्रेरणा देण्याचे काम केले असल्याचे शाह म्हणाले. त्यांनी महाराष्ट्र शासनाचे आभार मानले. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमचे मित्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अमित शहा यांनी केले व्यासपीठावरील नेत्यांचे स्वागत केले आणि आजचे उत्सवमूर्ती अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे स्वागत केले. अमित शहा यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून जमलेल्या नागरिकांचे कौतुक केले. तसेच महिलांच्या आणि जमलेल्या नागरिकांच्या मनात अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या बद्दल प्रेम, दिसून येत आहे. रणरणत्या उन्हात सुद्धा तुम्ही त्यांनि दिलेल्या शिकवणीला मन देऊन आलात त्याबद्दल त्यांना देखील अभिमान वाटत असेल असे बोल अमित शहा यांनी अप्पासाहेबांना उद्देशून बोलले दिसले. एकाच परिवारात समाजसेवेचा संस्कार एकाच परिवारात तीन पिढींमद्ये पहिल्यांदीच बघितला आहे. महाराष्ट्र शासनाने तुम्हाला महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन तुमच्या कडे बघून जीवनाचा दृष्टिकोन कसा ठेवावा यासाठी उत्तम उदाहरण महाराष्ट्र शासनाने दाखवून दिले आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाचे देखील र्कौतुक केले पाहिजे.टिळक,समर्थ रामदास ते नामदेव भक्ती च नेतृत्वसामाजिक चेतना महात्मा फुले सावित्रीबाई फुले आंबेडकर महाराष्ट्राच्या भूमी त्यांच्यासोबत अँपसाहेब यांची मन ठेवावा उम्च्याकडून सगळ्यांना प्रेरणा दिली आहे. अप्पासाहेब याना पदमभूषण पुरस्कार देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारशींमुळे मिळाला.

अमित शाह यांनी त्यांच्या कामाची जडणघडणी वाचून दाखवली. महाराष्ट्र भूषण सोहळा २०२२ चा मानपत्राचे वाचन केले. या मानपत्राच्या वाचनामध्ये रसाळ वाणी बरोबर समाजकार्य करायचे ठरवलेले असेल तर त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे अप्पासाहेब ,धर्माधिकारी हे आहेत. अप्पासाहेब यांनी त्यांच्या वडिलांपासून हि परंपरा पुढे ठेवली. प्रत्येक वेळेस गोर गरिबांच्या कामासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतला. वेद्यकीय शिबिरे, रोजगार मेळावे, रक्त दान शिबिरे, पर्यावरण पूरक संदेश आणि अशा अनेक कामात त्यांचा मोलाचा वाट आहे. भक्तीचा मुक्या प्रकार म्हणजे समाजसेवा. तसेच त्यांनाही आदिवासी पाड्यात जाऊन स्त्रियांच्या आणि त्यांच्या बालसंगोपनाच्या कार्यात मोलाचा वाटा आहे. तुमच्या पावित्र्य कार्याची दाखल घेऊन तुम्हाला महाराष्ट्र्र भूषण पुरस्कार देऊन सन्मनींत करण्यात आले आहे. अप्पासाहेब धर्माधिकारी याना साक्षात देवाशी तुमची तुलना केली जात आहे. सामाजिक सेवेचा वारसा त्यांनी पुढे नेला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेन्द्त फडणवीस यांचे अभर्मानतो कि त्यांनी खरोखरच चांगल्या कर्तुत्वाला महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले म्हणून आभार मानतो. आणि त्यांच्या जीवनाच्या कारकिर्दीला सन्मान करतो.

हे ही वाचा : 

अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२२ देऊन सन्मानित

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे खारघर येथील सेंट्रल पार्क दाखल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

 

Latest Posts

Don't Miss