spot_img
Monday, January 13, 2025

Latest Posts

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार भाजपमध्ये प्रवेश करणार,९ व्यांदा घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ

राज्याच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून अनेक बदल होत आहे.

राज्याच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून अनेक बदल होत आहे. महाराष्ट्रनंतर आता बिहारच्या राजकारणात सत्तापालट होणार आहे. बिहारचे मुख्यंमत्री नितीश कुमार (Nitish Kumar) हे आज मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहेत. त्यानंतर ते २८ जानेवारीला दुपारी ३.३० वाजता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपमध्ये प्रवेश करून ते ९ व्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे आता बिहारच्या राजकारणात लोकसभा निवडणुकांआधी मोठी उलथापालथ होत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा हे उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

सध्या बिहारमध्ये आरजेडी आणि जेडीयूचे सरकार होते. पण आता महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय नितीश कुमार यांनी घेतला आहे. तर अजूनसुद्धा आरजेडीकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. त्यामुळे नितीश कुमार यांनी त्यांचा निर्णय घेतल्यानंतरच आरजेडीची रणनिती समोर येणार आहे. २८ जानेवारीला जेडीयूच्या आमदारांची अनौपचारिक बैठक पार पडली. या बैठकीमधून बाहेर पडल्यानंतर आमदारांनी जेडीयू एनडीए सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, यावर रविवार पुन्हा एकदा बैठक होऊन या संदर्भात प्रस्ताव मांडला जाणार असल्याची माहिती आमदारांनी दिली आहे. नितीश कुमार यांच्या भाजप प्रवेशाबाबत अनेक दिवसांपासून चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे दिल्लीपासून ते पाटणापर्यंत अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत.

बिहार मध्ये सुरु असलेल्या राजकीय चर्चामुळे बिहारचे प्रभारी विनोद तावडे हे देखील २७ जानेवारीला बिहारमध्ये दाखल झाले आहेत. भाजप आणि जेडीयूचे सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपकडून मुख्यमंत्री पदासाठी आग्रह धरला जाऊ शकतो,असे बोलले जात आहे. सध्याही भाजप मुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपद या महत्वाच्या पदांसाठी आग्रह केला जात आहे. लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. या निवडणुकीच्या आधीच राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. नितीश कुमार हे आता भाजपमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चा सगळीकडे रंगल्या आहेत.

हे ही वाचा:

गोदा पट्ट्यातील आंदोलकांसाठी मनोज जरांगेंनी बोलवली बैठक

क्राउडफंडिंग मोहिमे अंतर्गत देणगी देणाऱ्यांना मिळणार राहुल गांधींची सही असलेलं टी-शर्ट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss