Saturday, July 27, 2024

Latest Posts

CM Eknath Shinde यांच्याकडून Mahesh Gaikwad यांच्या प्रकृतीची विचारपूस

हिललाईन पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या केबिनमध्ये चर्चा सुरू होती. त्यावेळी पुन्हा एकदा दोघांमध्ये वाद निर्माण झाला. त्यानंतर भाजप आमदार गणपत गायकवाड आणि एका साथीदाराने आपल्याकडील बंदूक काढून अंदाधुंद गोळीबार केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये जाऊन कल्याण पूर्व विभागातील माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी २ फेब्रुवारीच्या रात्री घडलेल्या घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिसांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली. तसेच गायकवाड यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांबद्दल डॉक्टरांशी चर्चा केली.

सत्य लोकांसमोर आले आहे

महेश गायकवाड यांच्यावर ज्युपिटर हॉस्पिटल येथे सहा तास शस्रक्रिया करण्यात आली आणि सहा गोळ्या डॉक्टरांनी काढून टाकल्या आहेत. महेश गायकवाडची प्रकृती गंभीर आहे. राहुल पाटीलसुद्धा आयसीयूमध्ये आहे. २ गोळ्या पोलिसांनी काढून टाकल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महेश गायकवाड आणि राहुल पाटील या दोघांना सुखरूप कसे ठेवता येईल, याबाबत डॉक्टरांशी चर्चा केली. सर्वानी सीसीटीव्ही फुटेज पाहिले आहे. पोलिसांची चौकशी सुरु आहे. सत्य लोकांसमोर आले आहे. जे यामध्ये जबाबदार आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्याचे काम पोलीस करतील. अशी माहिती कल्याण मतदारसंघांचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

सीसीटीव्ही फुटेज सुद्धा वेगाने व्हायरल

एकीकडे भाजप आणि शिवसेना एकत्र सरकारमध्ये आहेत तर दुसरीकडे त्यांच्याच आमदाराने पदाधिकाऱ्यावर गोळीबार केला. या घटनेमुळे राज्याच्या राजकारणात चांगलची खळबळ उडाली आहे. हिललाईन पोलीस स्टेशनमध्येच वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या कॅबिनमध्ये गोळीबार झाला. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर गोळीबार केला. याचे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा आता वेगाने व्हायरल होत आहेत. या प्रकरणात भाजप आमदार गणपत गायकवाड सह, हर्षल केणे, संदीप सर्वांकर यांना पोलिसांनी अटक केली आहे.

नेमकं काय झालं होतं? 

गेल्या काही दिवसांपासून भाजपा आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शिंदे गटातील शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यामध्ये अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावातील जागे वरून वाद सुरू होता. एका ५० गुंठे जमिनीचा वाद सुरू होता. मागील तीन दिवसांपासून हे प्रकरण सुरू होते. हा वाद सोडवण्यासाठी उल्हासनगरच्या कॅम्प क्रमांक पाच हिललाईन पोलीस ठाण्यात दोघांना बोलवण्यात आले. हिललाईन पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या केबिनमध्ये चर्चा सुरू होती. त्यावेळी पुन्हा एकदा दोघांमध्ये वाद निर्माण झाला. त्यानंतर भाजप आमदार गणपत गायकवाड आणि एका साथीदाराने आपल्याकडील बंदूक काढून अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये शिवसेना शिंदे गटातील शहर प्रमुख महेश गायकवाड आणि त्यांचा साथीदार राहुल पाटील यांना गोळ्या लागल्या. महेश गायकवाड यांच्यावर चार तर राहुल पाटील यांना दोन गोळ्या लागल्या.

हे ही वाचा: 

आमदारांनी गोळीबार करावा आणि तेही पोलीस स्टेशनमध्ये हे अत्यंत गंभीर – Jayant Patil

नाशिकमध्ये जय भवानी रोडवर गोळीबार, शहरात भीतीचे वातावरण

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss