सध्याच्या मॉर्डन लाईफस्टाईलमध्ये लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या आहेत. आजकाल दारूचे सेवन करण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. पुरूषांसोबत आता महिलांमध्ये ही ड्रिंक्स करण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, दारूचे सेवन हे प्रमाणाबाहेर केले तर आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. खरं तर एका दिवसात व्यक्तीने किती दारू प्यावी? खुलासा करण्यात आला आहे. काय सांगतो हा रिपोर्ट? चला तर मग जाणून घेऊयात. एका व्यक्तीने एका दिवसात किती दारू प्यावी? हे स्पष्ट करण्यात आले आहे.थोड्या प्रमाणात जरी अल्कोहोल घेतले तरी ते आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
अगदी कमी प्रमाणात अल्कोहोलयुक्त पेयं घेणे देखील एखाद्या व्यक्तीच्या आरोग्यासाठी देखील धोकादायक ठरू शकते. त्यामुळे, लोकांनी दारूचे सेवन करू नये, असे देखील सांगण्यात आले आहे. अनेकांना असे वाटते की, दारूचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. मात्र, असे अजिबात नाही जर तुम्ही एक-दोन पेग जरी दारूचे घेतले तरी सुद्धा तुमच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, असा धक्कादायक खुलासा जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या मोजणीतून समोर आला आहे. त्यामुळे, दारूचे एक-दोन पेग घेणाऱ्यांनी देखील आता सावधानता बाळगणे गरजेचे आहे आणि दारूचे सेवन करणे टाळले पाहिजे . दारू प्यायल्याने कॅन्सर आणि लिव्हर खराब होण्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. या रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, दारूच्या एका थेंबामुळे तुमच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.
दारूमध्ये मिसळले जाणारे अल्कोहोल देखील एक प्रकारचा विषारी पदार्थ आहे. ज्यामुळे, शरीराला गंभीर हानी पोहचू शकते, असे ही या अहवालात म्हटले आहे. यामुळे, किडनी आणि लिव्हरच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा:
देशातील ‘या’ दोन दिवसांत मुसळधार पावसाचे थैमान
राज्यातील ग्रामपंचायतीचा कारभार आजपासून ठप्प होण्याची शक्यता