Saturday, July 27, 2024

Latest Posts

दाट धुक्यामुळे दिल्लीतील विमानसेवा ठप्प, १०० हून अधिक विमाने रद्द

देशभरात सगळीकडे हिवाळा ऋतूला सुरुवात झाली आहे.

देशभरात सगळीकडे हिवाळा ऋतूला सुरुवात झाली आहे. वातावरणात बदल झाल्यामुळे सगळीकडे धुकं पसरलं आहे. दिल्लीतील विमानतळावर दाट धुक्यांची चादर पसरली आहे. या धुक्यांमुळे दिल्लीमधील विमान सेवा रद्द करण्यात आली आहे. आयजीआय (IGI Airport) विमानतळाला त्याचा मोठा फटका बसला आहे. स्पष्ट दिसत नसल्यामुळे ११० विमानांचे उशिराने उड्डाण होत आहे. वैमानिकांना पुढील दृश्य स्पष्ट्पणे दिसण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहे. दृष्यमानता कमी झाल्यामुळे १८ विमानाच्या उड्डाणासाठी अधिक वेळ लागत आहे. तसेच वेगवेगळ्या ठिकाणाहून येणारी आठ विमाने इतर ठिकाणी वळवण्यात आली आहेत. यातील सात विमाने जयपूरकडे तर एक अहमदाबादकडे वळवण्यात आल्या आहेत.

दाट धुक्यांची चादर पसरल्यामुळे विमान सेवेमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. विमानाच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आले आहेत. सध्या १२५ विमानामधील प्रवाशांना प्रवास करण्यास विलंब झाला आहे. तसेच यामध्ये १५ विदेशी विमानांचा समावेश आहे. तर इतर प्रवासी हे भारतामध्ये प्रवास करणारे आहेत. आज सकाळी दाट धुकं पडल्यामुळे पटना, अहमदाबाद, पुणे, जयपूर आणि मुंबईसह अनेक शहरात जाणाऱ्या विमानाचे उड्डाण विलंबाने होत आहे. पाटणाला जाणारे विमान पाच तास उशिरा पोहचले आहे. अहमदाबादहून उड्डाण करणारे विमान ८ तास उशिरा पोहचले आहे. सकाळी दिल्ली विमातळावरील दृष्यमानता १७५ मीटर एवढी होती. ज्यावेळेस धुकं कमी होण्यास सुरुवात झाली तेव्हा दृष्यमानता ५०० मीटर झाली. हवामानातील बदलामुळे विमानसेवेत अनेक बदल करण्यात आले आहेत. सगळीकडे दाट धुक्यांची चादर पसरल्यामुळे अनेक विमानांना पोहचण्यासाठी विलंब होत आहे.

दृष्यमानता कमी झाल्यानंतर विमानसेवा पूर्ववत करण्यासाठी आयजीआयच्या तिन्ही रनवे वरती दृष्यता वाढवण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. यामध्ये कमी दृश्यता असूनही विमानाच्या उड्डाणासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी विशेष उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत. दिल्लीमधील आयजीआय विमानतळावर दाट धुके पडल्यानंतर उपाययोजना राबवण्यासाठी सर्व साधन उपलब्ध आहेत. एखाद्या वेळेस दाट धुकं पडल्यामुळे जर परिस्थिती निर्माण झाली तर त्याला कॅटगिरी ३ असे ओळखले जाते. अश्या स्थितीमध्ये वैमानिकांना विशेष प्रशिक्षण देण्याची गरज असते.

हे ही वाचा:

ख्रिसमसचा केक कट करताना त्यावर दारु ओतून आग लावत ‘जय मात’दी घोषणा दिल्याने रणबीर नेटकऱ्यांकडून ट्रोल

डिप ब्लॅक ड्रेसमधला पूनम पांडेचा बोल्ड अंदाज,व्हिडिओ व्हायरल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss