Saturday, July 27, 2024

Latest Posts

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या घरी ईडी चौकशी, चौकशीनंतर कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

मागील काही दिवसांपासून संपूर्ण राज्यभरात ईडीच्या छापेमारीचे सत्र सुरु आहे.

मागील काही दिवसांपासून संपूर्ण राज्यभरात ईडीच्या छापेमारीचे सत्र सुरु आहे. आज झारखंडचे (Jharkhand) मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची ईडी चौकशी होणार आहे. हेमंत सोरेन यांना आज ईडीकडून चौकशीसाठी समन्स बजावण्यात आला आहे. तर आज दुपारी १ वाजताच्या सुमारास ईडी चौकशी होणार आहे. ईडीने सोमवारी जाऊन हेमंत सोरेन यांच्या घरी जाऊन छापेमारी केली, त्यावेळी हेमंत सोरेन घरी उपस्थित नव्हते. मागील तासांपासून झारखंडचे मुख्यमंत्री गायब होते, पण आज अखेर ४० तासांनंतर हे ईडी चौकशीसाठी हजर झाले आहेत. हेमंत सोरोन यांची चौकशी झाल्यानंतर त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरोन यांना जमीन घोटाळ्याशी संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीकडून मंगळवारी नोटीस पाठवण्यात आली आहे. ईडीचे संपूर्ण पथक हेमंत सोरोन यांच्या घरी पोहचले. त्यांच्या बंगल्यातून हरियाणा क्रमांकाची बीएमडब्ल्यू कार आणि रोख रकमेसह काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहे. त्याआधी सोमवारी हेमंत सोरेन यांच्या दिल्लीतील निवासस्थानावर ईडीने छापेमारी केली आहे. सोरोन यांना ईडीकडून नोटीस पाठवल्यानंतर २९ जानेवारीपासून सोरेन गायब झाले होते. ईडीकडून छापेमारी सुरु झाल्यानंतर ईडीने हेमंत सोरोन यांच्या घरातून मोठी रोकड जप्त केली आहे. त्यांच्या घरातून तब्ब्ल ३६ लाख रुपये रोकड जप्त करण्यात आली आहे. त्यासोबतच दोन आलिशान कार देखील जप्त केल्या आहेत.

सोमवारी हेमंत सोरोन यांच्या बंगल्यावर ईडीने छापेमारी केली. ईडीच्या पथकाकडून तब्ब्ल १३ तास चौकशी करण्यात आली आहे. त्यांना झारखंडमधील जमीन घोटाळ्याशी संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीकडून समन्स पाठवण्यात आला आहे. ईडीने बंगल्यातून रोख रक्कम आणि हरियाणा क्रमांकाची बीएमडब्ल्यू कार, आणखीन एक कार जप्त केली आहे. तसेच त्यांच्या घरात असलेली काही महत्वाची कागदपत्र देखील जप्त केली आहे. ईडीकडून त्यांना तब्ब्ल १० नोटीस पाठवण्यात आल्या होत्या. पण त्यांनी प्रत्येकवेळी चौकशीला हजर राहणे टाळले आहे. दिल्लीमध्ये ३ ठिकाणी केलेल्या धाडीमध्ये लाखो रुपये जप्त केले आहेत.

हे ही वाचा:

लढाऊ वृत्तीचा माझा जवळचा सहकारी आणि मार्गदर्शक गमावला – CM Eknath Shinde

Budget Session 2024 : अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी PM Modi यांनी दिली मोठी प्रतिक्रिया, म्हणाले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss