Monday, May 20, 2024

Latest Posts

जावई केएल राहुलच्या करियरमधील खराब काळाबद्दल बोलले सासरे सुनील शेट्टी

सुनील शेट्टी हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. सुनील शेट्टी यांनी नुकताच एक मुलाखत दिली. ज्यामुळे ते चर्चेत आहेत. हेरा फेरी 3 चित्रपटासंदर्भात सुरू असलेल्या वादावर देखील त्यांनी मोठे भाष्य केले आहे. केएल राहुलची मुलगी अथिया हिने काही दिवसांपूर्वी क्रिकेटर केएल राहुलसोबत लग्न केले आहे

सुनील शेट्टी हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. सुनील शेट्टी यांनी नुकताच एक मुलाखत दिली. ज्यामुळे ते चर्चेत आहेत. हेरा फेरी 3 चित्रपटासंदर्भात सुरू असलेल्या वादावर देखील त्यांनी मोठे भाष्य केले आहे. केएल राहुलची मुलगी अथिया हिने काही दिवसांपूर्वी क्रिकेटर केएल राहुलसोबत लग्न केले आहे. बाॅलिवूड अभिनेते सुनील शेट्टी (Suniel Shetty) हे गेल्या काही दिवसांपासून हंटर या त्यांच्या वेब सीरिजमुळे चर्चेत आहेत. विशेष म्हणजे सुनील शेट्टी हे वेब सीरिजचे जोरदार प्रमोशन करतानाही दिसले. आता लवकरच हेरा फेरी 3 च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला सुनील शेट्टी लवकरच पुनरागमन करणार आहे. काही दिवसांपूर्वी हेरा फेरी 3 या चित्रपट (Movie) करण्यास अक्षय कुमार याने नकार दिला होता. मात्र, अक्षय कुमार हा हेरा फेरी 3 मध्ये दिसणार नसल्याचे कळताच चाहते निराश झाले आणि अचानकच अक्षय कुमार (Akshay Kumar) याने हेरा फेरी 3 चित्रपटाला होकार दिला. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी हेरा फेरी 3 चित्रपटाचा प्रोमो शूट करण्यात आला.या मुलाखतीमध्ये सुनील शेट्टी यांनी काही मोठे भाष्य केले आहे. सुनील शेट्टी यांनी जावई केएल राहुल याच्याबद्दल मोठे भाष्य केले. विशेष म्हणजे यावेळी पहिल्यांदाच केएल राहुल याच्या करियरमधील खराब काळाबद्दल देखील सुनील शेट्टी हे बोलताना दिसले आहेत.

केएल राहुल हा माझा जावई नसून तो माझा मुलगा आहे. अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांनी एकमेकांना तब्बल चार वर्ष डेट करून लग्न केले. केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांच्या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. काही दिवसांपूर्वीच केएल राहुल आणि अथिया शेट्टीचे लग्न पार पडले.सुनील शेट्टी यांना केएल राहुल याच्या अपयशाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर सुनील शेट्टी म्हणाले की, आम्ही अपयशाबद्दल चर्चा करत नाहीत, कारण तो एक फायटर आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. सुनील शेट्टी पुढे म्हणाले, मुळात म्हणजे मी केएल राहुल याला क्रिकेट खेळायला नाही शिकू शकत. कारण तो देशासाठी खेळत आहे. गली क्रिकेट नाही खेळत. बोलणार फक्त बल्ला बोलेल, बाकी बोलून काहीच फायदा नाही.

हे ही वाचा : 

खोके माणसाला निष्ठा बदलायला लावतात – सुषमा अंधारे

संतोष जुवेकरचा नव्या चित्रपटाचा पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss