Thursday, February 29, 2024

Latest Posts

स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान Sardar Vallabhbhai Patel यांचा स्मृतिदिन

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा आज स्मृतिदिन आहे. सरदार पटेल हे स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान होते. सरदार पटेल यांनी देशाच्या स्वातंत्र्यात अभूतपूर्व योगदान दिले होते. हा दिवस भारतात राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झालेल्या स्वतंत्र भारतातील पहिले पंतप्रधान म्हणून सरदार पटेल यांच्याकडे पाहिले जात होते. पण, असे काय घडले की त्यांना हा मान मिळाला नाही, ते या लेखात जाणून घेऊया. भारतीय स्वातंत्र्य सेनानी, समाजसेवक सरदार वल्लभ भाई पटेल यांना सर्वजण भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखतात. त्यांचा जन्म जन्म ३१ ऑक्टोबर १८७५ रोजी गुजरातमधील नडियाद या ठिकाणी झाला. त्यांचे शिक्षण खूप उशिरा सुरू झाले. तरुण होईपर्यंत ते आपल्या घरीच वडिलांना शेती कामात मदत करत असत. त्यांच्या वडिलांचे नाव झवेरभाई तर आईचे नाव लाडबा असे होते. सुरूवातीपासूनच त्यांना देशसेवेची आवड होती. त्यामुळेच राजकीय कारकिर्दीच्या सुरूवातीपासूनच ते काँग्रेसमध्ये सक्रीय होते.  सरदार पटेल पंतप्रधान व्हावेत अशी काँग्रेसमधील प्रत्येकाच नेता आणि कार्यकर्त्याची इच्छा होती, पण गुरूस्थानी मानलेल्या महात्मा गांधींजींच्या सांगण्यावरून सरदार वल्लभभाई पटेल पंतप्रधान पदाच्या शर्यतीतून माघार घेतली.

भारताला स्वातंत्र्य लढ्य़ात वल्लभभाई पटेल यांचे महत्त्वाचे योगदान आहे. त्यासह लोकांमध्ये दारूबंदी, अस्पृश्यता आणि महिलांवरील अत्याचाराविरुद्ध लढ्यात त्यांनी पुढाकार घेतला होता. हिंदू-मुस्लिम ऐक्य टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला होता. ब्रिटीशांशी दोन हात करताना ते अनेकवेळा तुरुंगात गेले पण सरदार पटेलांच्या जिद्दीपुढे ब्रिटिश सरकारला नमते घ्यावे लागले. देश स्वतंत्र झाल्यावर काँग्रेसच्या गोटात सरकार स्थापन करण्याच्य़ा हालचाली सुरू झाल्या. नवे सरकार स्थापन करून देशाला उभारी देण्यासाठी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता कटीबद्ध होता. त्यामुळे काँग्रेसचे नवे अध्यक्ष पटेल हेच देशाचे पहिले पंतप्रधान होतील अशी आशा प्रत्येकाची होती. पण, झाले उलटेच. भारत आणि चीन यांच्यातील सीमा विवाद खूप जुना आहे. सरदार पटेल यांना चीनच्या कारस्थानांची पूर्वकल्पना होती. १९५० मध्ये त्यांनी नेहरूंना पत्र लिहून चीनकडून होणाऱ्या संभाव्य धोक्याबद्दल इशारा दिला होता. मात्र, नेहरूंनी त्या वेळी सरदार पटेलांच्या इशाऱ्याकडे लक्ष दिले नाही आणि परिणामी १९६२ मध्ये भारत-चीन युद्ध झाले.  सरदार वल्लभ भाई पटेल हे भारताचे सक्षम नेतृत्व होते. त्यांनी संपूर्ण आयुष्यात भारताच्या अखंडतेसाठी आणि विकासासाठी भरपूर प्रयत्न केले. अशा या महान लोहपुरुषाचे १५ डिसेंबर १९५० रोजी निधन झाले. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन!

Latest Posts

Don't Miss