Saturday, May 18, 2024

Latest Posts

Google Doodle ने मल्याळम सिनेमातील पहिल्या महिला लीडचा केला सन्मान

मल्याळम (Malayalam) चित्रपटसृष्टीतील पहिली महिला अभिनेत्री आणि पहिली दलित अभिनेत्री, पीके रोझी (P. K. Rosy) यांची आज दि १० फेब्रुवारी रोजी (शुक्रवारी) १२० व्या जयंती आहे.

मल्याळम (Malayalam) चित्रपटसृष्टीतील पहिली महिला अभिनेत्री आणि पहिली दलित अभिनेत्री, पीके रोझी (P. K. Rosy) यांची आज दि १० फेब्रुवारी रोजी (शुक्रवारी) १२० व्या जयंती आहे. या जयंतीनिमित्त गुगलने त्यांना डूडल (Google Doodle) समर्पित केले. तिला लहान वयातच अभिनयाची आवड निर्माण झाली. जेसी डॅनियल दिग्दर्शित विगाथाकुमारन (द लॉस्ट चाइल्ड) मध्ये तिने मुख्य भूमिका साकारली होती .

केरळच्या तिरुवनंतपुरममध्ये १९०३ मध्ये जन्मलेल्या रोझीला लहान वयातच अभिनयाची आवड निर्माण झाली. १९२८ मध्ये ‘विगथकुमारन’ (द लॉस्ट चाइल्ड) या चित्रपटात स्त्री लीडची भूमिका केल्यानंतर ती प्रसिद्ध झाली. चित्रपटातील एका उच्चवर्णीय महिलेची तिची भूमिका, ज्यामध्ये पुरुष लीड तिच्या केसात फुलाचे चुंबन घेतो असे दृश्य होते. तेव्हा रोझीला राज्य सोडण्यास भाग पाडले गेले.

असं म्हटलं जातं की, रोझीला केरळ सोडून जावं लागलं होतं. तिला एका लॉरीमध्ये बसवून तामिळनाडूला नेले जेथे तिने लॉरी चालकाशी लग्न केले.”समाजाच्या अनेक भागांमध्ये, विशेषत: महिलांसाठी परफॉर्मिंग आर्ट्सला परावृत्त केले जात असताना, रोझीने मल्याळम चित्रपट विगाथाकुमारन (द लॉस्ट चाइल्ड) मधील तिच्या भूमिकेने अडथळे तोडले. तिच्या कार्यासाठी तिला तिच्या हयातीत कधीही मान्यता मिळाली नाही, तरीही रोझीची कथा प्रसारमाध्यमांमधील प्रतिनिधित्वाविषयीच्या संभाषणांशी संबंधित आहे. आज तिची कथा अनेकांसाठी प्रेरणा आणि प्रेरणा म्हणून काम करते,” असे गुगलने म्हटले. आजचे गुगळे डूडल हे गुलाबांनी वेढलेल्या चित्रपटाच्या रीलवर पेंट केल्या सारखे आहे. Google लोगोसमोर पीके रोझीचे पोर्ट्रेट दाखवले आहेत. गुगल डूडलमध्ये रोझी साडी परिधान करताना दिसत आहे.

हे ही वाचा : 

Narendr Modi In Mumbai , पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यासाठी वाहतुकीत करण्यात आले ‘हे’ बदल

Teddy Day 2023, तुमच्या प्रियकराला द्या टेडी डे च्या खास शुभेच्छा…!

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss