Tuesday, April 30, 2024

Latest Posts

येत्या नवीन वर्षात तूम्ही SIP मध्ये गुंवणूक करण्याचा करताय तर हे नक्की वाचा

गुंतवणुकीचे अनेक पर्याय समोर असतात पण नकी आपला पैसा गुंतवायचा कशात हेच समजत नाही तर जाणून घ्या काही महत्वाच्या टिप्स म्युच्युअल फंडात (Mutual Funds) गुंतवणुकीचा सर्वात सोपा आणि लोकप्रिय मार्ग म्हणजे एसआयपी

गुंतवणुकीचे अनेक पर्याय समोर असतात पण नकी आपला पैसा गुंतवायचा कशात हेच समजत नाही तर जाणून घ्या काही महत्वाच्या टिप्स म्युच्युअल फंडात (Mutual Funds) गुंतवणुकीचा सर्वात सोपा आणि लोकप्रिय मार्ग म्हणजे एसआयपी (SIP) म्हणजेच पद्धतशीर गुंतवणूक योजना (Systematic Investment Plan). SIP द्वारे, तुम्ही नियमित अंतराने म्युच्युअल फंडात पैसे गुंतवून दीर्घकाळासाठी चांगला निधी जमा करू शकता.

दरम्यान, सर्व SIP गुंतवणूकदारांना चांगला आणि एकसारखा परतावा मिळतो असं नाही. अनेक उदाहरणं अशी आहेत, ज्यामध्ये पहिल्या दोन-तीन वर्षांत SIP परतावा नकारात्मक राहिला आहे. तर काहींना भरघोस परताना मिळाला आहे. तुम्हाला SIP चा पूर्ण फायदा घ्यायचा असेल, तर तुम्हाला SIP मध्ये नियमितपणे गुंतवणूक करत राहावे लागणार आहे. किती पासून आपण गुंतवनुक करू शकता हे पाहुयात.

तुम्ही SIP मध्ये गुंतवणूक करण्याच्या विचारात आहात तर हे पहा 
अनेकदा असे दिसून येते की, गुंतवणूकदार घाबरून SIP मधून पैसे काढतात, ज्याचे परिणाम त्यांना स्वतःला भोगावे लागतात. जर तुम्हाला यशस्वी एसआयपी गुंतवणूक करायची असेल आणि तुम्हाला SIP च्या पूर्ण क्षमतेने फायदा घ्यायचा असेल, तर तुम्हाला SIP मध्ये नियमितपणे गुंतवणूक करत राहावे लागेल. एसआयपीमध्ये गुंतवणूक करणार असाल तर त्याआधी काही गोष्टी नक्की खात घ्या.

सआयपीला गुंतवणुकीदारांची पसंती
लोक एसआयपीच्या माध्यमातून भारतातील गुंतवणूक झपाट्याने वाढली आहे पाहायला मिळालीआहे . AMFI डेटानुसार, सात वर्षांपूर्वी एसआयपीद्वारे मासिक योगदान ३ हजार कोटी रुपये होते, ते आता १६ हजार रुपये प्रति महिनाच्या पुढे गेलं आहे. एसआयपी गुंतवणुकीसाठी लोकप्रिय पद्धत ठरली आहे. एसआयपी लोकांना त्यांच्या गुंतवणुकीचे योग्य नियोजन करण्यास मदत करते. याचे अनेक फायदे असले तरी, त्याचे काही तोटेही आहेत. यामुळे, प्रत्येकाने एसआयपी करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

जोखीम घेण्याच्या क्षमतेचे परतावा अवलंबून
तुम्ही एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्याच्या सर्वात आधी तुमचं आर्थिक उद्दिष्ट ठरवा. आर्थिक उद्दिष्ट ठरवणे ही SIP चं नाही तर कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीची पहिली पायरी आहे. तुमचे उद्दिष्ट दीर्घकालीन आहे की अल्पकालीन हे ठरवल्याने गुंतवणुकीचा पर्याय निवडणं सोपं होईल. एसआयपी करण्यापूर्वी, तुम्ही तुमच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेचे मूल्यांकन केलं पाहिजं. तुम्हाला अनेक SIP मध्ये जास्त परतावा मिळू शकतो, पण तिथेही जोखीम जास्त असते. त्याच वेळी, कमी जोखमीच्या योजनांमध्ये परतावा देखील कमी असतो. त्यामुळे तुम्ही किती जोखीम घेऊ शकता, यावरही तुमचा परतावा अवलंबून असतो.तर अशा प्रकारे SIP मध्ये गुंतवणूक करू शकणार आहेत.

हे ही वाचा:

हिवाळ्यात बीटाचा रस पिणं शरीरासाठी ठरतं फायदेशीर

रामदास आठवलेंची Lok Sabha Election संदर्भात महत्त्वाची घोषणा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss