Wednesday, February 28, 2024

Latest Posts

Galaxy S२४ Series मध्ये; किती आहे फोनची किंमत?

सॅमसंग वीक ऑफरमध्ये तुम्ही Galaxy A२३ 5G फोन६९९१ रुपयांच्या डिस्काउंटनंतर २३९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

कोरियन कंपनी सॅमसंग आपली Galaxy S24 सीरिज जानेवारीमध्ये लाँच करणार आहे. लाँचचिंग इव्हेंट जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात होऊ शकतो. लाँचिंगची तारीख 18 जानेवारी आहे. मात्र अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. यावेळी Galaxy S24 सीरिजमध्ये तुम्हाला अॅपल सारखं एक खास फिचर मिळणार आहे जे तुम्हाला अडचणीत येण्यास मदत करेल. खरं तर कंपनी एस 24 सीरिजमध्ये इमर्जन्सी सॅटेलाइट टेक्स्टिंग फिचर देऊ शकते. म्हणजेच नेटवर्क नसलेल्या भागातही तुम्ही तमेसेज पाठवू शकाल. यासंदर्भात अजून कोणतीही घोषणा कंपनीने केली नाही आहे.

किंमत किती असेल?
लिक झालेल्या माहितीनुसार, कंपनी Galaxy S24 सीरिज एस 23 च्या किंमतीत लाँच करू शकते. सॅमसंगने Galaxy S23 सीरिज ७४९९९ रुपये ते १५४९९९ रुपये किंमतीत लाँच केली आहे. S23 अल्ट्रामध्ये मिळालेला २०० मेगापिक्सेलचा कॅमेरा. तसेच झूमिंग कॅपॅसिटीमुळे हा फोन वर्षभर चर्चेत राहिला आहे. त्यासरखाच S२४ लॉंच करण्यात येणार आहे. हा फोनदेखील चांगल्या फिचर्समुळे चर्चेत राहिल अशी कंपनीला आशा आहे.

या सीरिजमध्ये तुम्हाला क्वालकॉमची लॉस्ट चिप, स्नॅपड्रॅगन ८ Gen 3 प्रोसेसरचा सपोर्ट पाहायला मिळणार आहे. लीकमध्ये म्हटले आहे की, काही देशांमध्ये कंपनी एक्सीनॉस २४००चिपसह बेस आणि प्लस मॉडेल्सदेखील लाँच करू शकते. गॅलेक्सी एस 24 सीरिजच्या बेस मॉडेलमध्ये तुम्हाला ५० मेगापिक्सलच्या प्रायमरी कॅमेऱ्यासह ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल. फोनमध्ये 25 वॅट फास्ट चार्जिंगसह ४००० एमएएच ची बॅटरी मिळू शकते. त्याचप्रमाणे प्लस मॉडेलमध्ये४५फास्ट चार्जिंगसह 4900 एमएएचची बॅटरी मिळू शकते तर अल्ट्रा मॉडेलमध्ये ४५ वॅट फास्ट चार्जिंगसह ५००० एमएएचची बॅटरी मिळू शकते.

Galaxy A२३ 5G वर भन्नाट सूट

सॅमसंग वीक ऑफरमध्ये तुम्ही Galaxy A२३ 5G फोन६९९१ रुपयांच्या डिस्काउंटनंतर २३९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. फोन खरेदी करण्यासाठी HDFC बँकेचे कार्ड वापरल्यास तुम्हाला 2 हजार रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंटही मिळणार आहे. सॅमसंगच्या Galaxy A२३ 5G या फोनमध्ये तुम्हाला १०८० x २८०४ पिक्सल रिझोल्यूशनअसलेला ६. ६ इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले मिळेल. हा इन्फिनिटी V डिस्प्ले १२० हर्ट्झच्या रिफ्रेश रेटसह येतो. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी फोनमध्ये गोरिल्ला ग्लास देखील देण्यात आला आहे. फोनचा कॅमेरा सेटअप जबरदस्त आहे. यात एलईडी फ्लॅशसह चार रियर कॅमेरे आहेत. यामध्ये ५० MP मेन लेन्ससह ५ MPचा अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स, २ MP मॅक्रो आणि २ MP ची डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये ८
MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनची बॅटरी 5000mAhची आहे, जी २५ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज असलेल्या या फोनमध्ये अँड्रॉइड १२ वर आधारित OneUI ऑपरेटिंग सिस्टिम देण्यात आली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी कंपनी WiFi ८०२. ११ a/b/g/n/ac 2.4G+5GHz, VHT80, ब्लूटूथ ५.१ जीपीएस, यूएसबी टाइप-सी आणि ३. ५ MM हेडफोन जॅक सारखे पर्याय उपलब्ध आहे.

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss