Saturday, May 18, 2024

Latest Posts

भारताच्या प्रयत्नांमुळे २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष – पंतप्रधान नरेंद्र मोदी

२०२३ हे वर्ष संपण्यासाठी आता अवघे काही तास उरले आहेत.

२०२३ हे वर्ष संपण्यासाठी आता अवघे काही तास उरले आहेत. सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सगळेच उत्सुक आहेत. आज वर्षाच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन कि बात या कार्यक्रमाद्वारे देशातील जनतेला संबोधित केले आहे. यावेळी बोलताना मोदी म्हणाले, १४० कोटी भारतीय जनतेच्या जोरावर या वर्षात आपल्या देशाने अनेक विशेष कामगिऱ्या बजावल्या आहेत. अनेकांनी पत्र लिहून भारत ही सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. आज भारताचा प्रत्येक कोपरा न कोपरा आत्मविश्‍वासाने भरलेला आहे. विकसित भारताच्या भावनेने-आत्मनिर्भरतेच्या भावनेने काठोकाठ भरलेला आहे. २०२४ मध्येही आपल्याला तोच उत्साह आणि तोच वेग कायम ठेवायचा आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

भारताच्या प्रयत्नांमुळे २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात आले. यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या स्टार्टअप्सना अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. दिवाळीतील विक्रमी व्यवसायाने सिद्ध केलेच आहे की ,प्रत्येक भारतीय ‘व्होकल फॉर लोकल’ – ‘स्थानिक उत्पादनांसाठी आग्रह’ या मंत्राला महत्त्व देत आहे, असे मोदी म्हणाले. अनेक खेळाडूंनी उत्तम खेळून देशाचे नाव मोठे केले आहे. आता २०२४ मध्ये पॅरिस ऑलिम्पिक होणार आहे आणि त्यासाठी संपूर्ण देश आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देत आहे त्यांचे मनोबल वाढवत आहे. नाटू-नाटू गाण्याला ऑस्कर , ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ला मिळालेल्या सन्मानाबद्दल कळल्यानंतर संपूर्ण देश आनंदाने मोहरून उठला. बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर विश्वनाथ आनंद यांनी ‘बुद्धिबळ’ या खेळासाठी मानसिक तंदुरुस्ती किती महत्त्वाची आहे, यावर देखील नरेंद्र मोदी मन कि बात मध्ये बोलले आहेत.

मन कि बात या कर्यक्रामात मोदी म्हणाले, भारत इनोव्हेशन हब होतोय, हे या वस्तुस्थितीचे प्रतीक आहे की आपण थांबणार नाही. २०१५ मध्ये आपण ग्लोबल इनोव्हेशन रँकमध्ये ८१ व्या क्रमांकावर होतो, आज आपला क्रमांक ४० वा आहे. या वर्षी भारतात दाखल केलेल्या पेटंटची संख्या जास्त आहे, त्यापैकी सुमारे ६० % हे देशांतर्गत निधीचे होते. यावेळी क्यूएस एशिया युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये सर्वाधिक भारतीय विद्यापीठांचा समावेश झालाय.

हे ही वाचा:

राष्ट्रवादीच्या नेत्याने केले मोठं वक्तव्य, मला लोकसभा निवडणूक लढावायचीय…

“…म्हणूनी घनव्याकुळ मी रडलो नाहीये अजून” आस्ताद काळेला मातृशोक,पोस्ट शेअर करत झाला भावूक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss