Instagram ची सेवा रात्रीपासून ठप्प, जगभरातील लाखो यूजर्स वैतागले

काल दिनांक २१ मे २०२३ च्या (रविवार) रात्रीपासून इंस्टाग्रामची सेवा ही ठप्प झाली आहे. इंस्टाग्राम डाउन असल्यामुळे लाखो यूजर्स वैतागले आहेत.

Instagram ची सेवा रात्रीपासून ठप्प, जगभरातील लाखो यूजर्स वैतागले

काल दिनांक २१ मे २०२३ च्या (रविवार) रात्रीपासून इंस्टाग्रामची सेवा ही ठप्प झाली आहे. इंस्टाग्राम डाउन असल्यामुळे लाखो यूजर्स वैतागले आहेत. तसेच मेटा प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामनुसार, कंपनीला रविवारी (२१ मे) काही लोकांना अँप ऍक्सेस करण्यात समस्या येत असल्याचे समजले, त्यामुळे मोठ्या संख्येने लोकांनी तक्रारी केल्या. तथापि, कंपनीने प्रभावित वापरकर्त्यांची संख्या उघड केली नाही.

तसेच काल रात्रीपासून यूजर्स पोस्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु त्यांच्या पोस्ट या इंस्टाग्राम ला जात नाहीत. गतसेच लाईव्ह देखील होत न्हवते. तर अनेकांना मॅसेज केल्यावर ते मॅसेज लवकर पोहचत देखील न्हवते. अश्या अनेक अडचणींना काल रात्रीपासून यूजर्सला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे लाखो यूजर्स वैतागले आहेत. काल रात्रीपासून जवळपास १ लाख ८० हजार यूजर्सने रिपोर्ट केलं आहे.

आउटेज ट्रॅकिंग वेबसाइट डाउन डिटेक्टर डॉट कॉमच्या मते, यूएसमध्ये १ लाखांहून अधिक, कॅनडात २४ हजार आणि यूकेमध्ये ५६ हजार लोकांनी याबद्दल तक्रार केली आहे. कंपनीच्या प्रवक्त्याने ई-मेलद्वारे आउटेजबद्दल सांगितले की आम्ही शक्य तितक्या लवकर गोष्टी सामान्य करण्यासाठी काम करत आहोत आणि कोणत्याही गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. तसेच Downdetector.com नुसार, रविवारी १ लाख ८० हजार यूजर्सने रिपोर्ट केलं आहे. मेटाच्या प्रवक्त्याने ही समस्या लवकरात लवकर सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत असं स्पष्ट केलं. ग्राहकांना त्रास झाल्याबद्दल या प्रवक्त्याने यूजर्सची माफीही मागितली आहे. कंपनीने आऊटेजवर अधिक विवरणचा खुलासा केलेला नाही. मात्र, मेलचं उत्तर दिलं आहे.

हे ही वाचा : 

घरच्याघरी बनवा NATURAL आंबा पोळी, खाण्यास चविष्ट आणि भरपूर दिवस टिकणारी…

घरात पाल येण्याच्या त्रासाला कंटाळले आहेत का ? मग हे उपाय नक्की करा

हॉटेलमध्ये Tandoor Roti खाताय? लगेचच थांबवा,आरोग्यावर होतो त्याचा मोठा दुष्परिणाम

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version