Saturday, June 3, 2023

Latest Posts

घरात पाल येण्याच्या त्रासाला कंटाळले आहेत का ? मग हे उपाय नक्की करा

पालीला पाहून सर्वांचीच तारांबळ उडत असते. लहान असो की मोठा प्रत्येक जण पालीला अत्यंत घाबरतो. काही ज्यांना तर पालीचा किंवा कोणत्याही गोष्टीचा फोबिया (भीती ) काही जण तर पालीला पाहून जागेवरच उड्या मारू लागतात.

पालीला पाहून सर्वांचीच तारांबळ उडत असते. लहान असो की मोठा प्रत्येक जण पालीला अत्यंत घाबरतो. काही ज्यांना तर पालीचा किंवा कोणत्याही गोष्टीचा फोबिया (भीती ) काही जण तर पालीला पाहून जागेवरच उड्या मारू लागतात. घरात पाल येणे कोणालाही आवडत नाही. पण तरीही नको असलेल्या पाहुण्या सारखी पाल वारंवार घरी येत असते. घरातील किडे, छोटीछोटी पाखरे खाऊन पाल आपल्याला मदत तर करते परंतु पालीची प्रत्येकालाच किळस वाटते. तसेच अन्नावरून पाल फिरणेही आपल्या आरोग्यासाठी चांगले नसते. अशी एक आख्यायिका देखील आहे घरात जा पाल असेल आणि जर ती आपल्या डोक्यावर पडली तर अपशकुन मानला जातो. म्हणूनच आपण दरवेळेस पालीला हकलून लावतो. चला तर मग पालीला घरापासून दूर ठेवण्यासाठी आपण कोण कोणते घरगुती उपाय करू शकतो.

आपल्या घरात पाल येण्याचे बरीच कारणे असतात. पाली उरलेल्या किंवा गोड पदार्थांच्या वासाला आकर्षित होतात त्यामुळे घरात पालीचे प्रमाण वाढते व घरात पालीचे आगमन होते. उघड्या खिडक्या, दरवाज्याच्या फटी, व्हेंटिलेशन सिस्टीम च्या माध्यमातून सुद्धा पाली घरात येतात. तसेच पालींना उबदार व गरम वातावरण मानवते. म्हणून पाली एसी, फ्रिज, वॉशींगमशीन व गिजर इत्यादींच्या पाठी मुखतः दिसतात. गरम पाण्या कडे सुद्धा पाली आकर्षित होतात.

घरापासून पाली दूर ठेवण्याचे उपाय –

  • घरात पाली वाढू नये म्हणून आपले घर तसेच किचनओटा नेहमी स्वच्छ ठेवावे.किचन मध्ये उघड्यावर अन्न ठेवणे टाळावे.
  • कांदा आणि लसूण या मध्ये तीव्र गंध असतो जो पालीच्या इंद्रियांवर हल्ला करतो, कांद्याचे काही तुकडे किंवा लसणाच्या कच्च्या कांड्या घरात ठेवल्याने घरात पाली येणार नाहीत.
  • स्वयंपाकघरातील आणि घरातील उरलेले अन्न लगेच झाकून ठेवावे, जेणे करून अन्नाच्या शोधात पाळी घरात येणार नाहीत.
  • पालींपासून मुक्त होण्यासाठी नेप्थलीन गोळ्या घरातल्या कन्या कोपऱ्यात ठेवाव्यात.
  • घरातले वातावरण नेहमी थंड ठेवल्याने पाली घरात येत नाहीत.

हे ही वाचा : 

शरद पवारांनी सरकारवर बोलले खडेबोल

नरहरी झिरवळांचा एक वेगळाच अंदाज

अजित पवारांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर खोचक टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss