Saturday, March 2, 2024

Latest Posts

क्रिसमसच्या मुहूर्तावर Instagram युजर्सना मिळणार एक खास गिफ्ट

सोशल मीडिया ॲप इन्स्टाग्राम त्यांच्या युजर्ससाठी नवनवीन पर्याय घेऊन येत असतात. रील व्हिडीओ, स्टोरीवर गाणे लावून फोटो पोस्ट करणे, क्लोज फ्रेंड्स आदी खास फीचर्स याआधीसुद्धा इन्स्टाग्राम वापरकर्त्यांसाठी घेऊन आला होता. इन्स्टाग्राम ॲपने गेल्या वर्षी ‘नोट्स’ (Notes) हा पर्याय युजर्ससाठी उपलब्ध करून दिला होता. या नोट्स फीचरमध्ये युजर्सना फॉलोअर्स काय करीत आहेत याबद्दल एक अपडेट मिळते. तुम्ही गाणी ऐकत असाल किंवा एखाद्या ठिकाणी प्रवास करीत असाल, तर या गोष्टी नोट्समध्ये टाकून तुम्ही इतरांना सांगू शकता; तसेच काही संदेशसुद्धा लिहू शकता. तर आता कंपनीने या नोट्समध्ये आणखीन एक पर्याय जोडला आहे. युजर्स आता नोट्समध्ये त्यांचा व्हिडीओसुद्धा पोस्ट करू शकणार आहेत.

इन्स्टाग्रामवर व्हिडीओ नोट्स तयार करण्यासाठी कॅमेराचा पर्याय देण्यात आला आहे; पण त्यात तुम्ही केवळ दोन सेकंदांचा व्हिडीओ रेकॉर्ड करू शकणार आहात. तसेच तुमच्या इन्स्टाग्रामवरील मित्र-मैत्रिणी या व्हिडीओवर इमोजी किंवा मेसेजचा उपयोग करून तुम्हाला रिप्लाय देऊ शकतात. पण, तुम्ही या व्हिडीओ नोटमध्ये बॅक कॅमेरा किंवा तुमच्या गॅलरीमधून व्हिडीओ अपलोड करू शकणार नाही. इन्स्टाग्राम स्टोरी आणि या नोट्स व्हिडीओमध्ये युजर्सना गोंधळ होऊ नये म्हणून या फीचरला ‘सेल्फी कॅमेरा’ वापरण्याचा पर्याय देण्यात आला आहे.

इन्स्टाग्रामवर व्हिडीओ नोट्स तयार करण्याच्या खास स्टेप्स

१. सगळ्यात पहिल्यांदा तुमचे इन्स्टाग्राम ॲप उघडा आणि तुमचा डायरेक्ट मेसेज इनबॉक्समध्ये नेव्हिगेट करा.
२. तुमच्या इनबॉक्सवर ग्रुपच्या बाजूला ‘नोट्स’ असे एक सेक्शन असेल. नवीन नोट्स तयार करण्यासाठी ‘प्लस’ चिन्हावर क्लिक करा.
३. तुमचे प्रोफाइल चित्र स्क्रीनवर तुम्हाला दिसेल. तिथे व्हिडीओ चालू करण्यासाठी ‘कॅमेरा’वर टॅप करा.
४. त्यानंतर फ्रंट कॅमेरा म्हणजेच सेल्फी मोड चालू झालेला तुम्हाला दिसेल. तुमचा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यासाठी तळाशी असलेले निळे बटण प्रेस करून ठेवा.
५. तुम्‍ही तुमचा व्हिडीओ रेकॉर्ड केल्यानंतर प्रेस केलेले निळे बटण सोडून द्या. शेअर करण्यापूर्वी तुम्ही व्हिडीओ पुन्हा एकदा पाहू (प्रीव्ह्यु) शकता.
६. तसेच व्हिडीओच्या खाली तुम्ही कॅप्शन किंवा माहितीसुद्धा लिहू शकता.
७. पुढे तुमचा व्हिडीओ कोण पाहू शकतो ते निवडा. २४ तासांच्या कालावधीसाठी ‘म्युच्युअल फॉलोअर्स’ किंवा ‘क्लोज फ्रेंड्स’ यातील एक पर्याय निवडा.
८. तुमची व्हिडीओ पोस्ट करण्यासाठी ‘शेअर करा’वर टॅप करा आणि मग तुमचा व्हिडीओ नोट्समध्ये शेअर झालेला दिसेल.

तसेच कंपनी हे अपडेट सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करून देणार आहे. तसेच नवीन फीचर तुमच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर दिसण्यासाठी तुम्हाला तुमचे ॲप अपडेट करावे लागेल. तर आता तुम्ही लवकरच इन्स्टाग्राम नोट्सवर व्हिडीओ रेकॉर्ड करून मित्र-मैत्रिणी व तुमच्या फॉलोअर्सबरोबर या नवीन फीचरचा पुरेपूर आनंद लुटू शकणार आहात. क्रिसमसच्या मुहूर्तावर Instagram युजर्सना मिळणार एक खास गिफ्ट

 

 

हे ही वाचा:

मराठा आरक्षणासंदर्भात सोमवारी दिल्लीत बैठक होणार

लोकप्रतिनिधींना गावबंदी करणं हा गुन्हा, छगन भुजबळ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला

Latest Posts

Don't Miss