Wednesday, April 24, 2024

Latest Posts

Madhya Pradesh मध्ये मोठा अपघात, पुलावरून बस कोसळून १५ जणांचा मृत्यू

सध्या संपूर्ण राज्यासह देशभरात अपघाताचे सत्र हे वाढत आहे. असाच एक मोठा अपघात मध्यप्रदेश घडला आहे.

सध्या संपूर्ण राज्यासह देशभरात अपघाताचे सत्र हे वाढत आहे. असाच एक मोठा अपघात मध्यप्रदेश घडला आहे. मध्य प्रदेशच्या खरगोन जिल्ह्यात मंगळवारी एक खाजगी प्रवासी बसचा अपघात झाल्याची भीषण घटना ही घडली आहे. हि खाजगी बस पुलावरून खाली कोसळून मोठा अपघात झाला. या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला असून २५ जण जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

मध्य प्रदेशात हा मोठा अपघात घाला आहे. ही खाजगी बस खरगोनहून इंदूरला चालली होती. आणि त्या बसचा अपघात झाला. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात ऊण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दसंगा पुलावर झाला. या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर २५ जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात येत आहे. सकाळी साडेनऊच्या सुमारास हा अपघात झाला. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे म्हटले जात आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आणि बचावकार्य सुरू केले. खरगोनचे पोलीस अधीक्षक (एसपी) धरमवीर सिंग म्हणाले, ” खरगोनमध्ये पुलावरून बस कोसळल्याने १५ जणांचा मृत्यू झाला असून २५ जण जखमी झाले आहेत. बचावकार्य सुरू आहे.” तर राज्य सरकारने अपघातात मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपये, गंभीर जखमींना प्रत्येकी ५०,००० रुपये आणि किरकोळ जखमींना प्रत्येकी २५ हजार रुपयांची तत्काळ आर्थिक मदत जाहीर केली आहे.

हे ही वाचा : 

अजित पवार यांच्या विषयावर संजय शिरसाट यांनी शिंदे गटाची भूमिका मांडली

मुंबईत उघडलेल्या पहिल्या अॅपलच्या स्टोअरचे नाव Apple BKC

मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातही उभारणार रोहिदास भवन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss