Saturday, July 27, 2024

Latest Posts

NCP Sharad Pawar गटाच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) रणधुमाळीसाठी देशातील सर्वच पक्ष सज्ज झाले असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानेही (Nationalist Congress Party Sharad Pawar) (NCP) आगामी लोकसभा निवडणुकांसाठी आपली रणनीती आखायला सुरूवात केली आहे. अद्याप महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) जागावाटपाचा तिढा सुटला नसला तरीही सर्वाचाच पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. मंगळवारी, (२ एप्रिल) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने आगामी लोकसभा निवडणुकांसाठी आपल्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये, पक्षप्रमुख शरद पवार (Sharad Pawar), खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), माजी मंत्री जयंत पाटील (Jayant Patil), जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, आमदार रोहित पवारसह अनेक बड्या नेत्यांचा समावेश आहे.

महाविकास आघाडीमधील शिवसेना ठाकरे गटाने याआधीच आपल्या १७ स्टार प्रचारकांनी यादी जाहीर केली होती. आता, राष्ट्रवादिनेही आपल्या ४० सतार प्रचारकांनी यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या या पहिल्या यादीत अमोल कोल्हे, निलेश लंके, राजेश टोपे, एकनाथ खडसे, रोहिणी खडसे यांचादेखील समावेश आहे.

याशिवाय, फौजिया खान, पी. सी. चाको, धीरज शर्मा, ऍड. वंदना चव्हाण, धीरज शर्मा, सिराज मेहंदी, सोनिया दुहान, शब्बीर विद्रोही, यशवंत गोसावी, बाळासाहेब पाटील, पार्थ पोळके, ऍड. जयदेव गायकवाड, शशिकांत शिंदे, अशोक पवार यांचा समावेश आहे.

राष्ट्रवादीच्या या स्टार प्रचारकांच्या यादीत अरुण लाड, प्राजक्त तानपुरे, सुनील भुसार, नसीम सिद्दीकी, विकास लवंडे, रोहित पाटील, राजू आवळे, मेहबूब शेख, प्रकाश गजभिये, पंडित कांबळे, रवी वरपे, नरेंद्र वर्मा, राज राजापूरकर, संजय काळबांडे, जावेद हबीब, सक्षणा सलगर आणि पूजा मोरे यांचा समावेश आहे.

राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या लोकसभा उमेदवारीसाठी पहिली यादी जाहीर केली होती. या यादीमध्ये, बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे, शिरूर मतदारसंघातून डॉ. अमोल कोल्हे, वर्धा मतदारसंघातून अमर काळे, दिंडोरी मतदारसंघातून भास्करराव भगरे आणि अहमदनगर मतदारसंघातून निलेश लंके यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

हे ही वाचा:

भाजप खासदार Unmesh Patil करणार शिवसेनेत प्रवेश? Sanjay Raut यांची निवासस्थानी घेतली भेट

VANCHIT चर्चा करत नाही म्हणून आम्ही निवडणुका लढायच्या नाहीत का? SANJAY RAUT यांचा सवाल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss