Monday, May 20, 2024

Latest Posts

आज नीट युजी २०२२ चा निकाल होणार जाहीर

नॅशनल टेस्टिंग एजन्सी कडून यंदा पार पडलेल्या National Eligibility cum Entrance Test Undergraduate अर्थात NEET UG 2022 चा निकाल आज (७ सप्टेंबर) जाहीर केला जाणार आहे.

नॅशनल टेस्टिंग एजन्सी कडून यंदा पार पडलेल्या National Eligibility cum Entrance Test Undergraduate अर्थात NEET UG 2022 चा निकाल आज (७ सप्टेंबर) जाहीर केला जाणार आहे. आज अंतिम निकालासोबतच एनटीए अंतिम आन्सर (Answer Key) की आणि मेरीट लिस्ट (Merit List) देखील जाहीर करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी नीट २०२२ ची परीक्षा दिली आहे त्यांना आपला निकाल neet.nta.nic.in या अधिकृत वेबसाईट वर पाहता येणार आहे.

NEET UG निकाल २०२२ च्या निकालाची वाट पाहत आहे . वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या NEET UG परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे. निकाल जाहीर होताच सुमारे १८ लाख विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. या वर्षी NEET UG 2022 परीक्षेत बसलेले सर्व उमेदवार NTA च्या अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in वर जाऊन त्यांचा निकाल तपासू आणि डाउनलोड करू शकतात.

एनटीए कडू जारी नोटिफिकेशन मध्ये निकालाची केवळ तारीख देण्यात आली आहे. निकालाची वेळ दिलेली नाही. पण आज संध्याकाळच्या सत्रात निकाल जाहीर केला जाऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना neet.nta.nic.in या वेबसाईट वर लक्ष ठेवावे लागणार आहे.

NEET UG 2022 ची परीक्षा १७ जुलै २०२२ रोजी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने घेतली होती. ही परीक्षा देशातील आणि परदेशातील विविध ठिकाणी ५०० हून अधिक नियुक्त केंद्रांवर घेण्यात आली. NEET UG परीक्षेसाठी १८ लाखांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले होते. अर्जांच्या संख्येच्या बाबतीत NEET ही देशातील सर्वात मोठी प्रवेश परीक्षा आहे. त्यानंतर कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट आणि जेईई मेन येते.

नीट युजी 2022 चा निकाल कसा पहाल?

  • अधिकृत वेबसाईट neet.nta.nic.in ला भेट द्या.
  • होमपेजवर “Download NEET UG Result 2022.”लिंक वर क्लिक करा.
  • अ‍ॅप्लिकेशन नंबर, जन्मतारीख हे महत्त्वाचे तपशील टाकून लॉगिन करा.
  • आता स्क्रिनवर स्कोअरकार्ड दिसेल.
  • तुमच्या निकालाची प्रत आता तुम्ही प्रिंट आऊट काढून देखील ठेवू शकता.

 

हे ही वाचा  :

“भाजप आणि शिवसेना ओरिजनल म्हणजेच शिंदे गट आम्ही एकत्रित निवडणूक लढू” देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान

अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यानंतर ‘मुंबईत काल मंगलमूर्ती आणि अमंगलमूर्ती बघितले’ म्हणत शिवसेनेने लगावला टोला

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss