पुन्हा एकदा Sameer wankhede सह त्यांच्या कुटूंबियांना सोशल मीडियावरून धमकी

एनसीबीचे (NCB) माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडेसह त्यांच्या कुटूंबियांना पुन्हा एकदा सोशल मीडियावरून धमकी देण्यात आली आहे. आलेल्या धमकीची मुंबई पोलीस आयुक्तांनी दखल घेतली आहे.

पुन्हा एकदा Sameer wankhede सह त्यांच्या कुटूंबियांना सोशल मीडियावरून धमकी

एनसीबीचे (NCB) माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडेसह त्यांच्या कुटूंबियांना पुन्हा एकदा सोशल मीडियावरून धमकी देण्यात आली आहे. आलेल्या धमकीची मुंबई पोलीस आयुक्तांनी दखल घेतली आहे. या बाबतीत प्रथम माहिती अशी समोर आली आहे की, धमकी देणारा पाकिस्तानी हँडलर आहे. धमकी देणाऱ्यांनी दाऊदचे नाव लावून समीर वानखेडे यांना धमकी देण्यात आली आहे. समीर वानखेडे यांना वारंवार सोशल मीडियावर धमकीचे मेसेज येत आहेत.

यावेळी ही धमकी फक्त समीर वानखेडे यांनाच नाही तर त्यांच्या कुटूंबियांना देखील आली आहे. यावेळी समीर वानखेडे यांनी सांगितले की, मला आणि माझ्या कुटुंबाला अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहिमच्या नावाने धमक्या येत आहेत. यामुळे माझ्या जीवास धोका निर्माण झाला आहे. पोलिसांनी माहिती दिली आहे की, समीर वानखेडे यांना धमकी मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ या बाबतीत माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिली आहे.

 

समीर वानखेडे यांच्या अटकेला ८ जून पर्यत स्थागिती देण्यात आली आहे. समीर वानखेडे यांच्या विरोधात सीबीआयने एफआयआर (FIR) दाखल करण्यात आली आहे. सीबीआयचे म्हणाले आहे की, आर्यन खानच्या प्रकरणात त्यांच्या सुटकेच्या बदल्यात समीर वनखडेंनी २५ कोटींची मागणी केली होती. या प्रकरणात समीर वानखेडेच्या व्यतिरिक्त इतर चार जनांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

‘Zara hatke zara bachke’ ने पहिल्याच दिवशी केली कोटींची कमाई!

साराने केला शर्मिला टागोर सोबत अभिनय, व्हिडीओ सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल

Bigg Boss OTT’ S2 मध्ये होणार ‘या’ गायकाची Entry?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version