दर्शनम मोगुलैया हे सुप्रसिद्ध संगीतकार म्हणून ओळखले जातात. किन्नरा हे वाद्य ते वाजवतात. त्यांच्या या कुशलतेमुळे त्यांनी पदमश्री देखील पटकावला आहे. किन्नरा (Kinnera) हे एक दुर्लभ संगीत वाद्य आहे. दर्शनम मोगुलैया यांनी या वाद्याचा नव्याने शोध लावत ते पुन्हा प्रस्थापित केले. त्यांना ‘किन्नरा मोगुलैया’ या नावाने देखील ओळखले जाते. किन्नरा हा एक वीणा सारखे वाद्य आहे. मोगुलैया यांचे पूर्वज विविध पद्धतीचे किन्नरा बनवण्यात व वाजवण्यात अग्रेसर होते. १२ पायऱ्यांचे किन्नरा बनवणारे दर्शनम मोगुलैया हे पहिले व्यक्ती होते. २०१२ मध्ये भारत सरकारने किन्नरा संगीतकार म्हणून त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना पदमश्री पुरस्काराने सन्मानित केले.
नुकत्याच व्हायरल झालेल्या एका व्हिडीओ मध्ये दर्शनम मोगुलैया हे मजुरी करताना दिसून येत आहेत. हा व्हिडीओ हैद्राबाद मधील एका कन्स्ट्रक्शन साईट वरील असून यात दर्शनम मजुरी करताना दिसून येत आहेत. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मिडिया वरती एकच चर्चेचा विषय बनला. मिळालेल्या माहिती नुसार मोगुलैया यांची आर्थिक परिस्थिती ठीक नसून जेवढे पण पैसे त्यांना सरकारकडून मिळाले होते, ते सर्व पैसे कुटुंबाच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यात संपून गेले. आता त्यांच्याकडे २ वेळेला खाण्यासाठी देखील पैसे नाहीत. ७३ वर्षीय मोगुलैया यांना जबरदस्तीने मजुरी करावी लागत आहे. दर्शनम यांनी सांगितले कि ‘माझ्या मुलाला अधून मधून झटके येत असतात, त्याच्या आणि माझ्या स्वतःच्या औषधांसाठी मला मजुरी करावी लागत आहे. याशिवाय नियमित मेडिकल चेकअप असतात आणि बाकीचे खर्चही असतात ज्यामुळे मला मजुरी करावी लागते’. मोगुलैया यांनी सांगितलं कि त्यांना ९ मुलं झाली होती. त्यातील ३ जणांचा मृत्यू झाला आणि बाकी ३ जणांचे लग्न झाले असून ३ अजूनही शिकत आहेत.
सरकारने दिलेले एवढे पैसे नेमके खर्च कुठे झाले?
मोगुलैया यांच्या पत्नीचे ४ वर्षांपूर्वीच निधन झाले. मोगुलैया यांनी सांगितले कि त्यांनी कामासाठी अनेक ठिकाणी विचारणा केली. बऱ्याच जणांनी मला नाही म्हणून सांगितले. काही लोकांनी मला मिळालेल्या पुरस्कारारामुळे सहानभूती दाखवत थोडी रक्कम देखील दिली. पण मला कुणीही काम दिले नाही. त्यांनी सांगितले कि तेलंगणा सरकारकडून त्यांना जेवढे पण पैसे मिळाले होते ते सर्व पैसे त्यांनी मुलांच्या लग्नात खर्च केले. याशिवाय त्यांनी हैद्राबाद मध्ये एक प्लॉट देखील खरेदी केला होता व त्यावर घर बांधणे देखील सुरु केले होते पण पैश्यांच्या कमतरतेमुळे त्यांना ते काम मधेच थांबवावे लागले.
हे ही वाचा:
Rohit Vemula प्रकरणामुळे Prakash Ambedkar यांचे Congress वर ताशेरे
‘पॉर्न’वरून राजकारण गरम, Chitra Wagh यांच्या आरोपांवर किरण मानेंची जळजळीत टीका | Kiran Mane
Follow Us