Saturday, March 2, 2024

Latest Posts

संसद घुसखोरी प्रकरणाचा मास्टरमाईंड ललित झा दिल्ली पोलिसांच्या ताब्यात

संसदेतील घुसखोरीचा (Security Breach in Lok Sabha) मास्टरमाईंड समजल्या जाणाऱ्या ललित झा याला अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

संसदेतील घुसखोरीचा (Security Breach in Lok Sabha) मास्टरमाईंड समजल्या जाणाऱ्या ललित झा याला अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली आहे. चार आरोपींनी संसदेत घुसखोरी केल्यानंतर ललित झा यानं या घटनेचा व्हिडिओ त्याच्या एनजीओ पार्टनरला पाठवला होता, अशी माहिती पोलीसांना मिळाली आहे.

देशाच्या संसदेच्या सुरक्षेत अक्षम्य अशी चूक घडली आणि काही जणांनी सभागृहात घुसखोरी केली. मात्र हा प्लान दीड ते दोन वर्षापूर्वी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. संसदेत घुसखोरी करण्याचं प्लॅनिंग जवळपास दीड-दोन वर्षांपूर्वी केल्याचं समजतं. सोशल मीडियावर ओळख झाल्यानंतर सगळ्यांची पहिली एकत्रित बैठक मनोरंजनच्या कर्नाटकातील मैसूरमधील घराजवळ झाली. इथेच बेरोजगारी आणि इतर महत्वाच्या विषयांवर सरकारला जागं करण्यासाठी काही तरी मोठं करण्याचा प्लॅन त्यांनी केला.

लोकसभेत झालेल्या घुसखोरीच्या कटाचा मास्टरमाईंड ललित झा हाच असल्याचा पोलिसांना संशय होता. त्यानंतर त्याचा शोध सुरू होता. ललित झा यानेच 13 डिसेंबरची तारीख निश्चित केली होती, असे चौकशीत समोर आले. ललित घुसखोरीनंतर राजस्थानला गेला. राजस्थानला गेल्यानंतर तिथे आपल्या सहकाऱ्यांना भेटला आणि हॉटेलमध्ये राहिला. त्यानंतर पोलीस शोधत असल्याचे त्याला कळाले त्यानंतर ललित बसने दिल्लीला आला. पोलिसांनी त्यानंतर ललितला अटक केले.कर्तव्यपथ स्टेशनजवळ पोलिसांनी त्याला अडकवला.

गुरूग्राममध्ये ललित झा याने एक महत्त्वाची बैठक घेत हा कट आखला होता, असं पोलीस तपासात आली आहे. लोकसभेत मनोरंजन आणि सागर शर्माने घुसखोरी केली तेव्हा प्रेक्षक गॅलरीतून या प्रकाराचं शुटींग ललितनेच केलं आणि सोशल मीडियावर अपलोड केलं. तसेच, ललित झासोबत चौघेही आरोपी संपर्कात होते. घटना होण्याआधी त्याने चौघांचे फोन ताब्यात घेतले आणि तो फरार झाला, असं पोलिसांनी म्हटलंय. ललित झाचं शेवटचं लोकेशन नीमरानाजवळ आढळलंय. ललित झाचा संबंध असलेल्या एका एनजीओचीही चौकशी केली जातेय. या एनजीओला येणारा निधी कुठून येतो याचा तपास सुरू आहे.

नेमकं काय झालं ?

बुधवारी लोकसभेमध्ये दोन तरुणांनी घुसखोरी केली आणि दिल्लीसह संपूर्ण देशाला धक्का बसला. २२ वर्षांपूर्वी याच दिवशी संसदेवर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यामुळे बुधवारी हे तरुण अचानक प्रेक्षक गॅलरीतून खासदारांच्या आसनांच्या ठिकाणी उडी मारत असताना अवघ्या देशाच्या काळजाचा ठोका चुकला. मात्र, या तरुणांनी बेरोजगारी, महागाई, महिला सुरक्षा अशा प्रश्नांवर घोषणा द्यायला सुरुवात केल्यानंतर हा मुद्दा नागरिकांच्या समस्यांशी निगडित असल्याचं स्पष्ट होऊ लागलं.

हे ही वाचा:

Nana Patole यांचा थेट हल्लाबोल, भाजप शिवरायांचा महाराष्ट्र पेटवतंय…

संसदेत झालेल्या गोंधळावर संजय राऊतांनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss