Sunday, May 19, 2024

Latest Posts

Ram Navami2023, अयाेध्येतील राम मंदिराचे बांधकाम ८० टक्के पूर्ण, आज २० लाख भाविक दर्शन घेणार

अयोध्या येथील श्री रामाचे भव्य मंदिर १४ जानेवारी २०२४ रोजी सर्वसामान्यांसाठी खुले होणार आहे. पुढच्या वर्षी या मंदिरामध्ये रामजन्मोत्सव भव्य कार्यक्रम होणार आहे.

अयोध्या येथील श्री रामाचे भव्य मंदिर १४ जानेवारी २०२४ रोजी सर्वसामान्यांसाठी खुले होणार आहे. पुढच्या वर्षी या मंदिरामध्ये रामजन्मोत्सव भव्य कार्यक्रम होणार आहे. मंदिराच्या बांधकामाशी संबंधित नागरिकांनी ही माहिती दिली आहे. राम मंदिराचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. आज राम नवमीनिमित्त रामाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळणार आहे. रामजन्मभूमी मंदिराच्या उभारणीचे काम सध्या वेगाने सुरु आहे आणि हे काम पूर्णत्वाकडे जात आहे.

मंदिराच्या तळमजल्यावर मंदिराचे खांब उभारण्यात आले आहेत. त्यावर तुळस बसविण्याचे काम सुरु आहे. त्यांनतर छत बनवण्याचे काम सुद्धा सुरु आहे. रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा यांनी सांगितले की, मंदिराचे बांधकाम नियोजित वेळेनुसार सुरु आहे आणि वेळेवर पूर्ण केले जाईल. राम नवमीच्या निमित्ताने रामाच्या तात्पुरत्या मंदिरामध्ये दर्शनासाठी दोन्ही सत्रांमध्ये अध्या तासाने वेळ वाढवण्यात आली आहे. अयोध्या रेल्वे स्थानकावर भाविकांची गर्दी झाली आहे.

आज रामनवमीच्या निमित्ताने या मंदिरामध्ये सुमारे २० लाख भाविक शरयूत स्नान करतील आणि विविध मठ मंदिरांना सुद्धा भेट देतील. तात्पुरते राज जन्मभूमी मंदिर आणि कनक भवन येथे जयंती कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणामध्ये तयारी करण्यात आली आहे. १२ वाजता जयांची कार्यक्रम या मंदिरामध्ये करण्यात येणार आहे. कनक भवनामध्ये जयंतीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. तेथे मोठ्या संख्येने भाविक जमतात. रामनवमी पाहता अयाेध्या आणि परिसरामध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

हे ही वाचा : 

मोहित कंबोज यांचा गंभीर आरोप, वैभव कदम याची हत्या

प्रियंका चोप्राची चुलत बहीण मीरा चोप्राने बॉलीवूडवरील टिप्पणीवर प्रतिक्रिया दिली

जितेंद्र आव्हाडा यांच्या तत्कालीन बॉडीगार्डची आत्महत्या

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss