Sunday, May 19, 2024

Latest Posts

रमेश बैस यांची राज्यपाल पदी झाली नियुक्ती, जाणून घ्या कारकीर्द

भगत सिंग कोशियारी ( Bhagat Singh Koshiyari) यांनी राज्यपाल पदाचा राजीनामा दिला आहे. विद्यमान राज्यपाल भगतसिंग कोशियारी हे नेहमी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहिले आहेत.

भगत सिंग कोशियारी ( Bhagat Singh Koshiyari) यांनी राज्यपाल पदाचा राजीनामा दिला आहे. विद्यमान राज्यपाल भगतसिंग कोशियारी हे नेहमी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहिले आहेत.भगत सिंग कोशियारी यांनी महाराष्ट्रातील महान पुरुषांबाबत वाईट वक्तव्य केले होते आणि या वक्तव्यामुळे विरोधी पक्षाने त्यांच्यावर टीका केली होती त्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. कोशियारी यांनी काही दिवसांपूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)यांच्याकडे राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. आज त्यांचा राजीनामा भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu)यांच्याकडून स्वीकारण्यात आला आहे. त्यांच्या जागी रमेश बैस यांची राज्यपाल पदास निवड करण्यात आली आहे.

रमेश बैस (Ramesh Bais) हे छत्तीसगढ (Chhattisgarh) येथील राजपूरचे रहिवासी आहेत. त्यांचा जन्म २ ऑगस्ट १९४७ रोजी झाला आता ते ७५ वर्षाचे आहेत. सध्या ते झारखंड राज्याचे राज्यपाल आहेत. तसेच यापुर्वी २०१९ मध्ये त्यांनी त्रिपुराचे राज्यपाल म्हणूनही काम केले होते.सलग सात वेळा ते खासदार म्हणून निवडून आले. मध्य प्रदेश भाजपचे ते उपाध्यक्ष होते,भाजपचे सदस्य असून १९९९ मध्ये पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते केंद्रीय पर्यावरण आणि वन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) म्हणून काम केले होते.

१९७८ सालापासून रमेश बैस यांचा राजकीय प्रवास सुरु झाला १९७८ ते १९८३ या कालावधीत ते रायपूरमधून नगरसेवक राहिले होते. पुढे त्यांनी मध्य प्रदेशच्या विधानसभा सदस्यपदी झालेल्या निवडणुकीत निवडून आले. मध्य प्रदेश विधानसभेतील अनुमान समिती, पुस्तकालय समितीचे सदस्य राहिले आहेत. मध्यप्रदेशात भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदाचेही काम त्यांनी सांभाळले आहे. १९९८ साली रमेश बैस केंद्रीय पोलाद आणि खाण राज्यमंत्रिपदी नियुक्ती करण्यात अली होती. १९९९ साली बैस चौथ्यांदा खासदार बनले. २००४ साली रमेश बैस यांची पेट्रोलियम आणि प्राकृतिक गॅससंबंधीच्या स्थायी समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात अली होती. रमेश बैस तब्बल ७ वेळा लोकसभा खासदार म्हणून निभवडून आले.

हे ही वाचा : 

Bhagat Singh Koshyari यांचा राजीनामा मंजूर, रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

Anil Deshmukh नागपुरात दाखल, कार्यकर्त्यांनी केलं जंगी स्वागत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss