Saturday, March 2, 2024

Latest Posts

China मध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, अनेकांचा मृत्यू

चीन (CHINA) मधील गान्सू या ठिकाणी १८ डिसेंबर रोजी भूकंपाचे (EARTHQUAKE) धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता सहा पूर्णांक दोन इतकी मोजण्यात आली आहे. रात्री बाराच्या दरम्यान उत्तर पश्चिम भागात जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपामुळे इमारती कोसळून १११ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच २०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. प्रशासनाकडून बचाव कार्याचे काम सुरू आहे. भूकंपामुळे सर्वात जास्त नुकसान दियाओजी आणि किंघाई प्रांतामध्ये झाले आहे. या ठिकाणच्या इमारती कोसळल्यामुळे अनेक लोक ढिगाराखाली दबले गेले आहेत. त्यांना बाहेर काढण्यात बचाव पथक प्रयत्न करत असून मृत आणि जखमींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भूकंपाचा केंद्रबिंदू पस्तीस पूर्णांक सात अंश उत्तर अक्षांश आणि १०२.७९  पूर्व रेखांशावर दहा किलोमीटर खोलीवर नोंदवला गेला आहे. आपत्कालीन सेवांनी लोकांना मदत करण्यास सुरुवात केली असून त्यांच्या मदतीसाठी बचाव कार्य सुरू आहे. सोमवारी अर्थात १८ डिसेंबर रोजी पाकिस्तान मध्ये सुद्धा ५.८ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. मात्र यात कोणतीही हानी किंवा जीवित हानी झाली नाही. नॅशनल सिस्मिक मॉनिटरिंग सेंटर (National Seismic Monitoring Center) च्या अभ्यासानुसार भूकंप १३३ किमी खोलीवर झाला होता आणि त्याचा केंद्रबिंदू भारतातील जम्मू आणि काश्मीर (JAMMU AND KASHMIR) होता. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद (ISLAMABAD) सह इतर देशांमध्ये सुद्धा भूकंपाचे धक्के जाणवले.

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss