Saturday, July 27, 2024

Latest Posts

अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची जय्यत तयारी

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची प्रतीक्षा सध्या भारतीयांना लागली आहे. त्यातच हा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरु असल्याचं पाहायला मिळतयं.

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची प्रतीक्षा सध्या भारतीयांना लागली आहे. त्यातच हा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरु असल्याचं पाहायला मिळतयं. त्यातच राजकीय वर्तुळात देखील राम मंदिराच्या उद्घाटनावरुन सध्या राजकारण चांगलच तापलंय. पण अनेकांना उत्सुकता असलेलं हे राम मंदिर नक्की आहे तरी कसं किंवा त्याची वैशिष्ट्ये नेमकी कशी आहेत, याची उत्सुकता सध्या सर्वांना लागून राहिल आहे.

येत्या १७ जानेवारी पासून अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेला सुरुवात होणार आहे. तसेच २२ जानेवारी रोजी या मंदिराचा भव्य दिव्य असा लोकार्पण सोहळा पार पडेल. बालअवस्थेतील असलेल्या श्री रामलल्लाच्या एकूण तीन मूर्ती तयार केल्या जाणार आहेत. यासाठी जयपूरमधील मार्बल आणि कर्नाटकातील दोन ठिकाणहून कृष्णशीला निवडण्यात आलं आहे.

रामलल्लाच्या मूर्तीची वैशिष्ट्ये
दगड पाणी शोषणार नाही, वातावरणातील कार्बनसोबत रिऍक्ट करणार नाही असे निकष घालून हे दगड निवडण्यात आलेत. ज्यांची चाचणी कर्नाटकातील म्हैसूर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रॉक मेकॅनिक्स या संस्थेद्वारे करण्यात आलीये. या वैशिष्ट्यपूर्ण दगडांपासून तयार करण्यात आलेल्या तीन मूर्तींपैकी एक मूर्ती निवडण्यात येणार आहे. तयार केलेली नवीन मूर्ती ही अचल मूर्ती असेल. दरम्यान प्राचीन मूर्ती ही चल असणार असून ती उत्सव मूर्ती म्हणून म्हटली जाईल.

जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात नवीन मूर्तीचा अभिषेक सोहळा
जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात नवीन मूर्तीचा अभिषेक सोहळा पार पडणार आहे. शरयू नदीमध्ये या मूर्तीला अभिषेक घातला जाईल. अभिषेक सोहळा झाल्यानंतर श्री रामलल्लाच्या मूर्तीची काढण्यात येईल. अयोध्यातील सर्व मंदिराजवळून ही मूर्ती निघणार आहे. तसेच काही काही प्रमुख मंदिरात मूर्ती थांबवली देखील जाईल. २२ जानेवारी रोजी मिरवणूकीने मूर्ती श्री राम मंदिराच्या मुख्य गर्भग्रहात आणली जाणार आहे.

रामलल्लाची प्रतिष्ठापना
मंत्रोच्चार आणि विविध धार्मिक विधी पूर्ण करुन रामलल्लाची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. प्राणप्रतिष्ठापना सोहळा पूर्ण होईपर्यंत रामलल्लाच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असेल. प्राणप्रतिष्ठा संपल्यानंतरच ही पट्टी काढली जाईल. मंदिराच्या गर्भगृहामध्ये नवीन तयार करण्यात आलेली अचल मूर्तीच्या समोरच प्राचीन असलेली उत्सव मूर्ती देखील ठेवण्यात येईल. दोन्ही मूर्तींची दैनंदिन पूजा आणि नित्योपचार हे दररोज वेगवेगळे पार पडतील. अयोध्येतल्या एखाद्या सोहळ्यासाठी श्रीराम मूर्तीची मिरवणूक काढण्याचा निर्णय जर ट्रस्टने घेतला तर उत्सव मूर्तीची मिरवणूक काढण्यात येणार आहे.

मंदिराची वैशिष्ट्ये काय खास वैशिष्ट्य असणार आहेत
सध्या मंदिराच्या केवळ ग्राऊंडफ्लोअरचे काम सुरु आहे. ग्रांऊडफ्लोअरवरील गर्भगृह आणि पाच मंडपाचे काम जानेवारीत पूर्ण होईल.वेगवेगळ्या पद्धतीच्या माती, सिमेंट आणि रसायनचा वापर करून मंदिराचा पाया तयार करण्यात आलाय. आतापर्यंतच्या इतिहासात नेपाळ ते अयोध्या परिसरात झालेल्या भूकंपचा अभ्यास करून त्याहून ५० पट अधिक तीव्रतेचा भूकंप झाल्यास ही परिणाम होऊ नये अशा पद्धतीने मंदिराची उभारणी करण्यात आलीये. मंदिराच्या चहूबाजूने परकोटा म्हणजे संरक्षक भिंत उभारण्यात येईल. ज्याचा खर्च मंदिराच्या खर्चापेक्षा दोनशे कोटीने जास्त असणार आहे.


श्री राम मंदिराच्या दिशेने पाहणाऱ्या जटाऊ मूर्तीचे काम देखील केले जात आहे. कांस्य धातूचा वापर करुन १५ फूट बाय २० फुटाची जटाऊ मूर्ती राम सुतार यांनी साकारली आहे. परकोटाच्या बाहेर आणखी ७ मंदिरे देखील साकारली जाणार आहेत. यामध्ये महर्षी वाल्मिकी, वशिष्ट ऋषी, निशाद महाराज, सबरीमाता, अहिल्यादेवी यांची मंदिरे असतील.श्री राम मंदिराच्या व्यवस्थापनची जबाबदारी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची असेल. राम मंदिराची सुरक्षा दोन टप्प्यात असेल. ट्रस्ट आणि पोलिसांद्वारे स्वतंत्र सुरक्षा व्यवस्था असणार आहे. सुरक्षेसाठी उत्तरप्रदेश पोलिसांचे विशेष पथक तयार केले जाणार आहे.

हे ही वाचा:

संजय राऊतांची मोठी घोषणा, ठाकरेंची शिवसेना लोकसभेत २३ जागा लढणार

सरकारने २०२४ येण्याच्या आत आंतरवाली मधील सर्व गुन्हे मागे घ्यावे; मनोज जरांगे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss