Tuesday, April 23, 2024

Latest Posts

संपूर्ण देशाची माफी मागा, सुप्रीम कोर्टाने रामदेव बाबांना फटकारले!

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court of India) मंगळवारी, २ एप्रिल जनतेची दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवरून बाबा रामदेव (baba Ramdev) यांना फटकारलं. बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांच्या पतंजली (Patanjali) या आयुर्वेदिक उत्पादनांच्या जाहिरातींमध्ये चुकीचे दावे करण्यात आले होते. यावरून, कोर्टाने त्यांना फटकारत, ‘तुम्ही येथे येऊन फक्त नावाला माफी मागत आहात. कोर्टाच्या कारवाईसाठी तयार राहा. तुमच्या दिलगिरीवर आम्ही अजिबात समाधानी नाही. त्यामुळे, फक्त कोर्टाचीच नाहीतर संपूर्ण देशाची माफी मागा’, अशा शब्दांत ताशेरे ओढले.

इंडियन मेडिकल असोसिएशनने (Indian Medical Association) (IMA) पतंजली विरोधात नोव्हेंबर २०२३ रोजी केस दाखल केली होती. ऍलोपॅथी डॉक्टरांविरोधात जाणूनबुजून चुकीच्या जाहिराती पतंजलीच्या जाहिरातींमधून दाखवण्यात येत होत्या, असा आरोप आयएमए ने केला होता. त्यावरून कोर्टाने फेब्रुवारीमध्ये आदेश देत तात्काळ सर्व जाहिराती थांबवाव्यात असे आदेश दिले. याबाबत पुढील सुनावणी १० एप्रिल रोजी होणार आहे.

न्यायालयाने नुकतेच रामदेव आणि बाळकृष्ण यांना समन्स बजावले होते. न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सांगितले होते कि, पतंजली आयुर्वेदिक कंपनीने सतत दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध केल्याबद्दल जारी केलेल्या अवमान नोटिसीला उत्तर दिलेले नाही.

सर्वोच्च न्यायालयाची प्रतिक्रिया

या प्रकरणावरून सर्वोच्च न्यायालयाने बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांना चांगलेच फटकारले आहे. “तुमचा मीडिया विभाग तुमच्यापेक्षा वेगळा नाही,” असे सर्वोच्च न्यायालयाने म्हंटले आहे. “नोव्हेंबर महिन्यात तुम्हाला इशारा दिला गेला होता तरीही तुम्ही पत्रकार परिषद घेतली. या प्रकरणात फक्त एकच प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आला आहे, तर दोन प्रतिज्ञापत्र दाखल करायला हवी होती.” सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालय पुढे म्हणाले, “तुम्ही कायद्याचं उल्लंघन कसं केलं? सर्वोच्च न्यायालयात हमीपत्र देऊनही तुम्ही कायद्याचं उल्लंघन केलं. कायद्यातील बदलांबाबत तुम्ही मंत्रालयाशी संपर्क साधला होता का? तुम्ही निकालासाठी सज्ज व्हा.” पुढे बाबा रामदेव आणि बाळकृष्ण यांना ते म्हणाले,” तुम्हाला कोर्टात दिलेलं वचन पाळावं लागेल, तुम्ही प्रत्येक मर्यादा मोडली आहे.”

हे ही वाचा:

भाजप खासदार Unmesh Patil करणार शिवसेनेत प्रवेश? Sanjay Raut यांची निवासस्थानी घेतली भेट

VANCHIT चर्चा करत नाही म्हणून आम्ही निवडणुका लढायच्या नाहीत का? SANJAY RAUT यांचा सवाल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss