Sunday, May 19, 2024

Latest Posts

मूडीज कंपनीच्या या निर्णयाचा अदानी समूहाला बसला अजून एक मोठा धक्का

हिंडेनबर्ग (Hindenburg) रिसर्च सेंटरने काही दिवसांपूर्वीच अदानी (Adani Group) समुहासंदर्भात एक अहवाल सादर केला. या अहवालातून अदानी समुहावर फसवणुकीचे आरोप करण्यात आले आहेत. या अहवालानंतर अदानी समूहाचे संचालक, सर्वेसर्वा गौतम अदानीं (Gautam Adani) हे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. या अहवालाचे परिणाम हे लवकरच शेअर बाजारात दिसले. शेअर बाजारामध्ये अदानी समूहाचे अनेक शेअर्सची किंमत घसरली आहे. यामुळे गौतम अदानी हे जगातील श्रीमंतांच्या यादीतून बाहेर पडले आहेत. गौतम अदानी यांना आणखीन एक मोठा धक्का बसला आहे. कारण हिंडेनबर्ग (Hindenburg) रिसर्च सेंटरने सादर केलेल्या अहवालामुळे आता मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसने समूहातील ४ कंपन्यांचे रेटिंग आउटलुक कमी केले आहे.

अमेरिकेत असलेल्या हिंडेनबर्ग (Hindenburg) या संस्थेने २४ जानेवारी रोजी अदाणी समूहावर(Adani Group) एक अहवाल सादर केला होता. त्यानंतर भारतासह जगभरात एकच खळबळ उडाली आहे. कारण हिंडेनबर्ग या संस्थेने अदानी समूहाने अनेक दशकांपासून स्टॉक मॅनिप्युलेशन आणि अकाउंटिंग फसवणूक केल्याचा आरोप केला.तसेच अनेक प्रश्न देखील उपस्थित करण्यात आले आहेत. त्यामुळे अदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठी घसरण झाल्यामुळे मूडीजने आता अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड, अदानी ग्रीन रिस्ट्रिक्टेड ग्रुप, अदानी ट्रान्समिशन स्टेप-वन आणि अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड यांना निगेटिव्ह रेटिंग आऊटलूक अंतर्गत ठेवले आहे. त्यामुळे अदनी समूहाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.

अगोदर अदानी समूहाच्या (Adani Group) कंपन्यांचे रेटिंग आउटलुक स्थिर होते आता मूडीजने ‘निगेटिव्ह’ केले आहे त्यांचे रेटिंग आउटलुक पूर्वी ‘स्टेबल’ होते. यावर मूडीज कडून सांगण्यात आले आहे की, हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालात फसवणूक आणि हेराफेरीचे आरोप झाल्यानंतर समूह कंपन्यांच्या बाजार मूल्यांकनात मोठी घसरण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे”. असे मूडीज कडून सांगण्यात आले आहे.

हे ही वाचा : 

आता मुंबई- शिर्डी आणि मुंबई-सोलापूर प्रवास होणार आणखी सुपरफास्ट, जाणून घ्या वंदे भारत एक्स्प्रेसची सविस्तर माहिती

पहिल्याच दिवशी कॅप्टन रोहित शर्माने झळकावले शतक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss