Watch Video, Odisha Train Accident नंतर तब्ब्ल ५१ तासानंतर पहिली ट्रेन धावली, अन् रेल्वेमंत्र्यांनी जोडले हात

काल दिनांक ४ जून रोजी रात्री १०.४० मिनिटांच्या सुमारास बालासोर या मार्गावरून पहिली ट्रेन ही धावली ज्या ट्रॅक वर अपघात झाला त्याच ट्रॅक वरून ही ट्रेन धावली आहे.

Watch Video, Odisha Train Accident नंतर तब्ब्ल ५१ तासानंतर पहिली ट्रेन धावली, अन् रेल्वेमंत्र्यांनी जोडले हात

शुक्रवार दिनांक २ जून रोजी ओडिशातील (Odisha) बालासोर येथे संध्याकाळी एक मोठा रेल्वे अपघात झाला. मालगाडी, कोरोमंडल एक्स्प्रेस (Coromandel Express) आणि हावडा एक्स्प्रेस (Howrah Express) या तीन गाड्यांची धडक होऊन हा अपघात झाला. या अपघातामध्ये जवळपास २७५ नागरिकांचा मृत्यू तर ९०० हून अधिक नागरिक हे जखमी झाले होते. या ठिकाणी मोठ्या शर्तीने बचावकार्य हे सुरु होते. परंतु आता या अपघातानंतर तब्बल ५१ तासानंतर तिथे पहिली ट्रेन धावली आहे.

काल दिनांक ४ जून रोजी रात्री १०.४० मिनिटांच्या सुमारास बालासोर या मार्गावरून पहिली ट्रेन ही धावली ज्या ट्रॅक वर अपघात झाला त्याच ट्रॅक वरून ही ट्रेन धावली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्वतः मालगाडीला हिरवा झेंडा दाखवला आणि यावेळी अनेक माध्यमे आणि रेल्वे अधिकारी देखील उपस्थित होते. मालगाडी विशाखापट्टणम बंदरातून राउरकेला स्टील प्लांटकडे जात होती.

विशेष म्हणजे, कोरोमंडल एक्स्प्रेस शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास बालासोर येथील बहनगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ मुख्य मार्गाऐवजी लूप लाइनमध्ये घुसल्यानंतर तेथे उभ्या असलेल्या मालगाडीला धडकली. या अपघातात बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेसचाही अपघात झाला. या अपघातात २७५ जणांचा मृत्यू झाला आहे.

हे ही वाचा:

World Bycycle Day का आणि कधी साजरा केला जातो? वाचा सविस्तर…

‘या’ ५ संकल्पांचे करा पालन आणि World Enviroment Day 2023 करा साजरा…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version