Friday, April 19, 2024

Latest Posts

अर्थसंकल्पात सर्व्हायकल कॅन्सरसाठी कोणत्या तरतुदी करण्यात आल्या आहेत, जाणून घ्या सविस्तर माहिती

१ फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला.

१ फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. अर्थसंकल्प सादर करताना मोदी सरकारच्या आतापर्यंतच्या कामाचा लेखाजोगा सांगण्यात आला आहे. यंदा जाहीर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात आरोग्य विभागाच्या विकासावर भरपूर योजनांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये सर्व्हायकल कॅन्सर (Cervical Cancer) थांबवण्यासाठी ९ ते १४ वयोगटातील मुलींसाठी मोफत लसीकरण मोहीमेला (Free Vaccination Campaign) मंजुरी देण्यात आली आहे. लवकरच या मोहिमेला सुरुवात होणार आहे. मिशन ‘इंद्रधनुष’ अंतर्गत ही योजना राबवण्यात आली आहे.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (SII) सर्व्हायकल कॅन्सर थांबवण्यासाठी Cervavac नावाची लस विकसित केली आहे. HPV च्या चार प्रकारांपासून संरक्षण प्रदान करते – १६,१८,६ आणि ११ . SII चे CEO आदर पूनावाला यांनी यामध्ये सांगितले आहे. या लसीची किंमत २०० ते ४०० रुपये प्रति लस असणार आहे. बाजारामध्ये गर्भाशय ग्रीवाच्या लसी उपलब्ध झाल्या आहेत.या लसीची किंमत प्रति डोस २,५००ते ३,३०० रुपये असणार आहे. २०१६ साली सिक्कीम सरकारने GAVI नावाची लस खरेदी केली होती. त्यानंतर ती लास ९ ते १४ वर्ष वयोगटातील मुलींना देण्यात आली. सिक्कीम सरकारने या कार्यक्रमा अंतर्गत ९७ टक्के मुलींचे लसीकरण पूर्ण केले आहे.

सर्व्हायकल कॅन्सरमुळे बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे हिचे आज निधन झाले आहे. पूनम पांडेच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिच्या निधनाची पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये लिहिले आहे, आजची सकाळ आपल्या सगळ्यांसाठी धक्कादायक आहे. कॅन्सरशी झुंज देणारी आपली लाडकी पूनम पांडे आपल्याला सोडून गेली” पूनम पांडेला सर्व्हायकल कॅन्सर (Cervical Cancer) अर्थात गर्भाशयाचा कर्करोग होता, असे या पोस्टमध्ये लिहिण्यात आले आहे.

हे ही वाचा:

Sachin Tendulkar चा व्हिडिओ वायरल, टी शर्ट पाहून गाडी थांबवत घेतली चाहत्यांची भेट

तुमच्याकडे स्वतःचा पक्ष कुठे आहे ? – उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss