Saturday, July 27, 2024

Latest Posts

अर्थव्यवस्था चांगली आहे तर उद्योजकांनी भारत का सोडला? – Prakash Ambedkar

PM-Kisan साठी उद्धृत केलेल्या लाभार्थ्यांची संख्या आणि डेटा संशयास्पद आहे! InterimBudget मध्ये फक्त GYAN सादर केले आहे.

१ फेब्रुवारी २०२४ रोजी देशाचा २०२४-२५ या वर्षातील अंतरिम अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Union Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी जाहीर केला. मोदी सरकारच्या काळातील हा अर्थसंकल्प असून निर्मला सीतारमण यांची अर्थसंकल्प सादर करण्याची सहावी वेळ होती. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी आपली प्रतिक्रिया मांडली आहे. काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जयंत पाटील, युवा नेते आदित्य ठाकरे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी बजेटबाबत निराशा व्यक्त करत बजेटवरील त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

“व्हायब्रंट गुजरात” मधील लोकांचा बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश 

सरकार फक्त ज्ञान देत आहे पण भारतातील तरुण, गरीब, महिला आणि शेतकरी यांच्यासाठी सरोकार नाही. अर्थमंत्री केवळ स्वत:ला थापा मारण्यात, भाषणबाजीत आणि खोटे बोलण्यात गुंतलेल्या पाहायला मिळाल्या! जर अर्थव्यवस्था चांगली कामगिरी करत असेल, तर गेल्या ९ वर्षांत १२,८८,२९३ उच्च-निव्वळ व्यक्ती आणि उद्योजकांनी भारत का सोडला? असा सवाल सोशल मिडियाच्या ‘एक्स’ वर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी विचारला आहे. ७,२५,००० लोकांनी, बहुतेक “व्हायब्रंट गुजरात” मधील लोकांनी बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश करण्याचा प्रयत्न का केला? वास्तविक सरासरी उत्पन्न ५०% ने वाढल्याबद्दल डेटा स्रोत काय आहे? PM-Kisan साठी उद्धृत केलेल्या लाभार्थ्यांची संख्या आणि डेटा संशयास्पद आहे! InterimBudget मध्ये फक्त GYAN सादर केले आहे. अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी अर्थसंकल्प आणि सरकारवर केली आहे.

अर्थ संकल्प म्हणजे टोपी घालण्याचा प्रकार

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रायगड जिह्ल्याच्या दौऱ्यावर आहेत. ते १ आणि फेब्रुवारी रोजी  रायगडचा दौरा करणार आहेत. त्यानंतर ते ४ आणि ५ तारखेला रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये जाऊन दौरा करणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या रायगड मतदार संघाला त्यांनी दुपारी भेट दिली. पेण मध्ये त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, मोदी सरकारच्या काळातील हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. मी बोललो होतो सगळे जादूचे प्रयोग सुरु आहेत. अर्थ संकल्प म्हणजे टोपी घालण्याचा प्रकार, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी मोदींवर टीका केली आहे.

हे ही वाचा:

आगामी लोकसभा निवडणुकीत कळसाला भगवा फडकवायचा आहे – उद्धव ठाकरे

आम्हाला न्याय आणि समान वागणूक का दिली जात नाही? आदित्य ठाकरेंचा सवाल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss