Saturday, July 27, 2024

Latest Posts

२७ फेब्रुवारीला का साजरा केला जातो मराठी राजभाषा दिन? जाणून घ्या सविस्तर माहिती

राज्यभरात दरवर्षी २७ फेब्रुवारीला मोठ्या उत्साहात ''मराठी राजभाषा दिन'' (Marathi Bhasha Diwas) साजरा केला जातो.

राज्यभरात दरवर्षी २७ फेब्रुवारीला मोठ्या उत्साहात ”मराठी राजभाषा दिन” (Marathi Bhasha Diwas) साजरा केला जातो. राज्य विधिमंडळाकडून या दिवसासाठी काही नियम निश्चित करून देण्यात आले आहेत. प्रसिद्ध मराठी ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रीवरी रोजी जन्मदिन असतो. या दिवसाचे औचित्य साधून हा दिवस मराठी राजभाषा दिन म्ह्णून साजरा केला जातो. कुसुमाग्रजांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परिदृश्यावर लक्षणीय प्रभाव पाडला आहे. त्यांनी मराठी वैज्ञानिक भाषा म्हणून संवर्धन करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने त्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून घोषित केला आहे. याचं मराठी दिनाचा इतिहास काय आहे ते जाणून घेऊया.

२७ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर यांचा वाढदिवस असतो. त्यांना “कुसुमाग्रज” म्हणून ओळखले जाते. कवी विष्णू वामन शिरवाडकर हे मराठी नाटककार, कादंबरीकार, लघुकथा लेखक, कवी आणि मानवतावादी होते. त्यांनी अनेक विषयांवर लेखन केले आहे. न्याय, स्वातंत्र्य आणि गरिबीसारख्या सामाजिक आजारांबद्दल त्यांनी लिखान केले आहे. मराठी साहित्याची प्रतिभा ओळखून त्याचे कौतुक करणे हे या दिवसाचे उद्दिष्ट आहे. १९९९ मध्ये कवी कुसुमाग्रज यांच्या निधनानंतर सरकारने “मराठी राजभाषा गौरव दिन” साजरा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर मराठी साहित्याच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांसाठी दोन पुरस्कार सुरु करण्यात आले आहेत.

‘मराठी भाषा गौरव दिन’ यादिवशी मराठी साहित्याचे कौतुक केले जाते. भारतामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात बोलली जाणारी भाषा मराठी आहे. कुसुमाग्रजांच्या निधनानंतर सरकारने १९९९ मध्ये ”मराठी राजभाषा गौरव दिन” साजरा करण्यास सुरुवात केली. पूर्वी महारथी, महाराष्ट्री, मराठी किंवा मल्हाटी अशी म्हणून ओळखली जायची. यादिवशी शाळा आणि वेगवेगळ्या ठिकाणी निबंध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि लेखन स्पर्धा आयोजित केल्या जातात. मराठी भाषेचे मूल्य आणि वारसा जोपासण्यासाठी अनेक ठिकाणी सरकारी अधिकारी विविध कार्यक्रम आणि कार्यशाळाही आयोजित करतात. लेखक विष्णू वामन शिरवाडकर यांनी पाच दशकाच्या कारकिर्दीत १६ खंड कविता, तीन कादंबऱ्या, आठ लघुकथा, सात खंड निबंध, १८ नाटके आणि सहा एकांकिका प्रकाशित केल्या होत्या.

हे ही वाचा:

Manoj Jarange Patil यांच्या आरोपावर देवेंद्र फडणवीस यांनी दिली त्यांची प्रतिक्रिया म्हणाले…

सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करून घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही; जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss